मुंबई, 19 जानेवारी- सध्या मनोरंजन विश्वात किरण माने ( kiran mane controversy) हे नाव चर्चेत आहे. राजकीय भूमिका मांडल्यांने स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे. यावर वहिनीने स्पष्टीकरण देखील दिलं आहे. अशातच स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte )या मालिकेतील एका अभिनेत्रीने (ashvini mahangade) राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत काही फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. सध्या ही पोस्ट सगळीकडे चर्चेत आहे.
अभिनेत्री अश्विनी महांगडे ही स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारताना दिसते. नुकतीच आश्विनी महांगडेने राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील (r. r. patil) यांचा मुलगा रोहित पाटील (rohit patil) यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''तो एकटा लढला आणि जिंकूणही आला…! 23 वर्षाच्या तरुणाने आपले संस्कार जपत संयमाने विरोधकांशी लढाई जिंकून युवापीढीसमोर एक आदर्श घालून दिला.
वाचा-'मीच इंडियातील पहिली प्रेग्नंट होस्ट' भारती सिंग म्हणते एकावेळी करते दोन ...
जेव्हा रक्तातचं जिंकण्याची धमक असते तेव्हा हरविण्यासाठी कितीही षडयंत्र रचले गेले तरी त्याला भेदून पार करणे आणि विरोधकांना आपल्या ताकदीचा परिचय करून देणे आवश्यक असते.आमचे बंधूतुल्य एक संस्कारी व संयमी युवानेतृत्व रोहीत आर.आर पाटील यांनी स्वर्गीय आर.आर.आबांचे स्वप्न साकार करीत कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर एकहाती सत्ता खेचून आणल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा''.
View this post on Instagram
आश्विनी महांगडे सामाजिक कार्यात देखील सक्रिय
आश्विनी महांगडेला सर्वजण अभिनेत्री म्हणून ओळखतात मात्र ती सामाजिक कार्यात देखील सक्रिय असते. 'रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान' याच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी आश्विनी महांगडे पार पाडताना दिसते. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आश्विनी महांगडे सातत्याने महिलांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी, माहवारी शाप की वरदान, सॅनिटरी नॅपकिनबद्दल माहिती पुरवणे, तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याबद्दल महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम करत असते.
रोहित पाटील यांच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक
नगरपंचायत निवडणुकीचे (Maharashtra Nagar Panchyat Election Result 2022) निकाल आता स्पष्ट झाले असून महाविकास आघाडी आणि भाजपकडून दावे प्रतिदावे सुरू आहे. तर दुसरीकडे, सर्वपक्षीय विरोधात असताना राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी एकहाती सत्ता खेचून आणली आहे. त्यांच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडेने देखील यासाठी रोहित यांच्या विजयासाठी पोस्ट लिहित त्यांच्या यशाचे कौतुक केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment, NCP, R.r patil. ncp