मुंबई, 19 जानेवारी- प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेत्री भारती सिंग (Bharti Singh) पहिल्यांदाच आई होणार आहे. अशा अवस्थेतमध्ये तिनं कर्लसचा आगामी शो ‘हुनरबाज देश की शान’ च्या (Hunarbaaz Desh Ki Shan) चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. प्रेग्नेंट असताना काम करण्याचा निर्णय भारतीला अभिमानस्पद वाटतो आहे. शिवाय तिनं सर्व आयांना आपला विचार बदलावा असं देखील सांगितलं आहे. यावेळी तिनं स्वत:ला भारतातील पिहिली प्रेग्नेंट होस्ट असल्याचे सांगितलं, भारती आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) या शोचे होस्टिंग करताना दिसणार आहे.
22 जानेवारीपासून सुरू होणार ‘हुनरबाज देश की शान’
‘हुनरबाज देश की शान’ हा कर्लसचा शो 22 जानेवारीपासुन सुरू होणार आहे. चॅनेलच्या प्रोमोमध्ये भारची सिंग शोसाठी तयार होतान दिसत आहे. यावेली तिनं स्वत:ला भारतातील पहिली प्रग्नेंट अॅंकर म्हटलं आहे. ती म्हणाली की, तो जमाना गेला जेव्हा प्रेग्नेंट महिला घरात बसत होत्या. आपल्या सर्वांच्या आई नेहमी आपल्यावर बंधने लादत असतात. हे करू नको, ते करू नको, विश्रांती घे.... असं त्यांचं मत असतं. यासाठीच मला सगळ्या आई वर्गाचा विचार बदलायचा आहे. तसेच ती तिच्या नेहमीच्या कॉमेडी अंदाज पुढे म्हणाली की, चॅनेल तिन लोकांकडून काम करून घेत आहे. मात्र पैसे फक्त दोन व्यक्तींचे देत आहे.
Hunarbaaz ke manch par aa rahe hai desh ke pehle pregnant anchors. Apni jeetod mehnat se Bharti badal rahi hai poore desh ki soch ko.
Kijiye salaam iss naari ke jazbe ko aur dekhiye #Hunarbaaz Desh Ki Shaan 22nd January se, har Sat-Sun, raat 9 baje sirf #Colors par. pic.twitter.com/fowMt3Hoke — ColorsTV (@ColorsTV) January 18, 2022
भारती सिंग प्रेग्नेंट असताना करत आहे शुटिंग
कर्लस चॅनेलने प्रोमो शेअर करत म्हटलं आहे की, हुनरबाजच्या सेटवर येत आहे देशातील पहिली प्रेग्नेंट महिला होस्ट...आपल्या कष्टाच्या जीवावर भारती बदलत आहे संपूर्ण देशाचा विचार. या नारी शक्तीला करा सलाम आणि पाहा हुनरबाज देश की शान 22 जानेवारीपासून फक्त कर्लसवर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Tv shows