जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'जितके लोक अरुंधतीवर प्रेम करतात तितकाच अनिरुद्धचा तिरस्कार करतात..वाईट वाटतं', मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

'जितके लोक अरुंधतीवर प्रेम करतात तितकाच अनिरुद्धचा तिरस्कार करतात..वाईट वाटतं', मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

'जितके लोक अरुंधतीवर प्रेम करतात तितकाच अनिरुद्धचा तिरस्कार करतात..वाईट वाटतं', मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

आई कुठे काय करते (aai kuthe kay karte )या मालिकेने 600 भागाचा टप्पा पूर्ण केला. यानिमित्त मालिकेत अनिरुद्धची नकारत्मक भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी ( milind gawali ) यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 फेब्रुवारी- स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते  (aai kuthe kay karte ) या मालिकेने लोकप्रियतेचे आणि टीआरपीचे सर्व रेकॉर्ड आतापर्यंत तोडले आहे. ही मालिका प्रेक्षाकांच्या मनात स्थान निर्माण करायला यशस्वी झाली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र मग ते सकारात्मक असो की नाकारत्मक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आणि करत आहेत. नुकताच या मालिकेने 600 भागाचा टप्पा पूर्ण केला. यानिमित्त मालिकेत अनिरुद्धची नकारत्मक भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी ( milind gawali ) यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेते मिलिंद गवळी साकारताना दिसतात. तर अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारते. अरुंधतीच्या प्रवासात नेहमीच अनिरुद्धने अडथळे निर्माण केले आहेत. अनिरुद्धची भूमिका नकारात्मक आहे. याच कारणामुळे सोशल मीडियावर अनिरुद्धला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. असं जरी असलं तरी मिलिंद गवळी यांनी नेहमीच अनिरुद्धच्या चूका सर्वांसमोर सोशल मीडियावरुन मांडल्या आहेत. नकारात्म भूमिका साकारताना प्रेक्षक अनेकवेळा त्या कलाकारांचा तिरस्कार करताना दिसतात. मात्र ही त्यांच्या कामाची पोचपावतीट असेत. या सगळ्याशी संबंधीत मिलिंद गवळी यांनी आता एक पोस्ट लिहिली आहे. वाचा- देवमाणूस 2 मालिकेत नवीन एंट्री, सोनू आहे सोशल मीडिया स्टार मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 600 Episodes Yet Another Mile Stone"६०० भाग पूर्ण झाले…“आई कुठे काय करते” या मालिकेतल्या संपूर्ण teamचं खूप खूप अभिनंदन.तुम्हा मायबाप प्रेक्षकांचे अगदी मनापासून खूप खूप आभार,प्रेक्षकांनी ही मालिका अगदी सुरुवातीपासूनच डोक्यावर घेतली, पहिल्या एपिसोड पासूनच अरुंधती देशमुख ही मनाला भावली, प्रेक्षकांच्या मनात तिने घर केलं, आणि अगदी 600 एपिसोड नंतर सुद्धा मनात रुजली, बहरली, फुलली,पहिल्याच एपिसोडमध्ये अनिरुद्ध देशमुख ती उशिरा घरी येते म्हणून तिला घराच्या बाहेर काढतो, तो प्रसंग पाहून प्रेक्षकांत बरोबर माझं स्वतः हि मन हळहळलं,मला स्वतःला अनिरुद्ध देशमुख कसा आहे तो तेव्हाच कळला,पहिल्या एपिसोड पासून ते आता 600 एपिसोड पर्यंत ह्या अनिरुद्ध देशमुख वर अक्षरशहा शिव्यांचा वर्षाव झाला, झाला काय होतोच आहे,जितके लोक अरुंधती वर प्रेम करतात तितकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त अनिरुद्ध देशमुख चा तिरस्कार करतात. वाचा- ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये आता दिसणार नाही ही अभिनेत्री, हे आहे त्याचे कारण मला काय त्याचा फार आनंद होतो अशातला भाग नाहीये, वाईट वाटतं, कोणाला शिव्या खाणं आवडतं, अरुंधती बरोबर वादावादीचे भांडणाचे सिन झाल्यावर खरंच मनाला दुःख होतं, पणSomebody has to do this dirty job of playing this bloody Anirudh Deshmukh who is useless worthless talks nonsense.परत पण या ६०० एपिसोड्स मध्ये अनिरुद्ध देशमुख ची खूप चांगली बाजू सुधा प्रेक्षकांच्या समोर आली, मुलांवरचं प्रेम, त्यांच्या भविष्याची काळजी, घर चालवण्यासाठी कष्ट करणे, आई-वडिलांवरचं प्रेम , चूक कबूल करणं, कुटुंबाला महत्व देणं,खूप अशा त्याच्या चांगल्या गोष्टी सुद्धा समोर आल्या,आई कुठे काय करते ची पटकथा नमिता वर्तक लिहिते, ती जेव्हा मला म्हणाली कि मला तुझ्या मध्ये अनिरुद्ध दिसतो,नंतर मी आत्मपरिक्षण करायला सुरुवात केली,आणि खरंच आश्चर्याची गोष्ट म्हणजे, माझ्यात अनिरुद्ध देशमुख कुठून कुठून भरलाय,तो मलाच कधी दिसला नव्हता,आत कुठेतरी दडून बसला होता,हळूहळू डोकं बाहेर काढायला लागला,नमिताचे खूप आभारी, मला अनिरुद्ध दिल्या बद्दल आणि माझ्यातला अनिरुद्ध दाखवल्याबद्दल,कारण मला माहिती आहे जितका माझ्यातला अनिरुद्ध राक्षस आतून बाहेर येईल तितकाच तोमला एक चांगला माणूस बनवत जाईल,कदाचित म्हणून प्राणसाहेब, अमरीशपुरी, अमजद खान, राजशेखर , निळूभाऊ फुले ही माणसं अतिशय चांगली होती, प्रेमळ होती, सज्जन होती.त्यांच्यात आतला राक्षस पडद्यावर बाहेर आला आणि मनाने ते निर्मळ आणि स्वच्छ झाले.

जाहिरात

Anirudh Deshmukh हाNegative role जरी मी करत असलो,तरी सुद्धा माझ्यातली Positivity कधी ही कमी होणार नाही..६००च्या पुढे..ह अशी काही पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात