युट्युब वर वैष्णवीचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कडक शो च्या माध्यमातून ती विविध व्हिडिओतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. धर्मा मुव्हीज क्रिएशनच्या शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील या वेबसीरिजमध्ये वैष्णवीने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. व्हॅलेंटाईन डे आणि धोका, एक परदेसी मेरा अशा व्हिडिओमध्ये देखील ती दिसली आहे. वाचा-'लय अंग दुखायले का..', वहिनीसाहेबांच्या ट्रेडिंग रील्सवर चाहत्याची भन्नाट कमेंट देवमाणूस 2 मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सोनूची एंट्री झाली आहे. ही सोनू खूप श्रीमंत असून आपल्या जागेच्या व्यवहारात अडचणी आल्याने ती डॉक्टरची मदत मागायला वाड्यात येते. मात्र डॉक्टरची तिची भेट होत नसते अशातच बज्या सोनूला उचलून डॉक्टरकडे घेऊन येतो आणि तिच्यावर उपचार करायला सांगतो. या उपचारावर सोनू डॉक्टरचे आभार मानत त्यांना डॉक्टर अंकल म्हणते. यानंतर पुढे काय होणार याचा उलगडा येणाऱ्या भागात होणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial