Home /News /entertainment /

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत आता दिसणार नाही ही अभिनेत्री, हे आहे त्याचे कारण

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत आता दिसणार नाही ही अभिनेत्री, हे आहे त्याचे कारण

झी मराठीवरली 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi reshimgath) ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील एका अभिनेत्री लवकरच मालिकेचा निरोप घेण्यार असल्यीची माहिती समोर आली आहे.

  मुंबई, 26 फेब्रुवारी- झी मराठीवरली 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi reshimgath) ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत चालली आहे. नुकतीच मालिकेत यशची मैत्रीण जेसिकाची एंट्री झाली होती. जेसिकाचे नाव जेन कटारिया (Jane Kataria) आहे. खऱं तर समीर आणि यशने प्लॅन करून जेसिकालं आणलं होतं. आता हा प्लॅन यशस्वी झाला आहे आणि यशसोमर नेहानं प्रेमाची कबुली दिली आहे. यामुळे मालिकेतील जेसिकाचा ट्रॅक संपला आहे. त्यामुळे लवकरच ती मालिका सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तिनं शेवटचा सिन देखील शुट केल्याची माहिती समोर आली आहे. एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, जेसिका लवकरच मालिका सोडणार आहे. शिवाय तिनं शेवटचा भाग देखील शुट केला आहे. जेसिका मालिकेत यशची गर्लफ्रेंड बनून आली होती. तिची यशची जवळीकता पाहून शेवटी नेहाने यशसमोर प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे यश आणि नेहा यांचा लव्ह ट्रॅक मालिकेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच जेसिका मालिकेचा निरोप घेणार आहे. वाचा-'श्रीवल्ली'चा गायक सिड श्रीरामची 'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर हजेरी जेसिका फेम जेन कटारिया रशियन (Russian Actress) आणि मॉडेल (Model) आहे. तिने अनेक मालिका आणि जाहिरातीमध्ये काम केलं आहे. तिनं तमन्ना भाटियासोबत एका जाहिरातीतसुद्धा काम केलं आहे. जेनने तमन्नासोबतच एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती साडीमध्ये दिसून येत आहे. जेस आपल्या फिटनेससाठी खूपच सजग आहे. ती सतत जिममध्ये घाम गाळताना दिसून येते. तिच्या इन्स्टाग्रामवर जिममधील अनेक फोटो पाहायला मिळतात.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  नेहाने यशसमोर प्रमाची कबुली दिली असली तरी या दोघांना अनेक अडचणींना सामना करावा लागणार आहे. कारण नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये परी यशला बाबा मानन्यास नकार देताना दिसत आहे. त्यामुळे आता यश आणि नेहाचं नातं पुढे जाणार की नाही, परी यशचा बाबा म्हणून स्वीकार करणार की नाही, यश आणि नेहाला आपल्या प्रेमाचा बळी द्यावा लागेल का, ही परिस्थिती दोघं कशी हाताळणार, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. नेहा आणि यशची आवडती जोडी लग्नाच्या नात्यात बांधली जावी आणि परी, यश आणि नेहाचं छान कुटुंब तयार व्हावं अशीच प्रेक्षकांची अपेक्षा आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या