मुंबई, 20 सप्टेंबर : आई कुठे काय करते मालिकेतून सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते मिलिंद गवळी एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जात आहे. मालिकेत त्यांनी साकारलेल्या अनिरुद्धला तोड नाही. प्रेक्षकांनी अनिरुद्ध ला भरभरुन प्रेम दिलं आहे. मिलिंद गवळी सोशल मीडियावरही फार सक्रीय असतात. अनेक फोटो व्हिडीओ तसंच त्यांच्या भावना ते पोस्टमधून लिहित असतात. अशीच एक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. ज्यात आयुष्याचं काहीतरी गणित चुकलं हे का? असा प्रश्न ते विचारता दिसत आहेत. आई कुठे काय करते मालिकेच्या बिझी शेड्यूलमधून मिलिंद बाहेर आऊटिंगला जात असतात. नुकतेच ते निसर्गाच्या सानिध्यात फिरायला गेले होते. सुंदर धबधब्याखालची अद्भुत दृश्य त्यांनी डोळ्यांनी न्याहाळली. सोबत पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटलंय, निसर्गाच्या सानिध्यात आपलं मन खूप शांत होतं, आणि पाण्याच्या धबधब्याजवळ जर जायला मिळालं तर मनात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते, अद्भुत दृश्य डोळ्यांना दिसतं, डोंगरावरून कोसळणार पाणी आणि खडकावर पडल्यानंतर त्याचा सुंदर सा ध्वनी, मन भारावून टाकतं, निसर्गाच्या शक्तीचा सुंदर असा अनुभव मिळतो.
मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये पुढे शहारातील पावासाला लोक किती घाबरतात त्याविषयी लिहिलं आहे. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte : ‘अनिरुद्ध वेडा झालाय’ ; लेटेस्ट एपिसोड पाहून प्रेक्षकांना कमेंट आवरेना त्यांनी म्हटलंय, आपण पण एक निसर्गाचा छोटासा भाग आहोत याची जाणीव होते, पण हाच पाऊस, हेच पाणी शहरांमध्येही पडत असतं, पण तिथे आपल्याला त्याची भीती वाटते, मन अस्वस्थ होतं, रस्त्यावर पाणी तुंबेल का? ट्राफिकचा कोळंबा होईल का? लोकल ट्रेन बंद होतील का? जनजीवन विस्कळीत होईल का? कामावर वेळेवर पोचता येईल का? मुलं शाळेत व्यवस्थित जातील का? 26 जुलै चा प्रसंग परत तर येणार नाही ना? शहरात राहणारी बरीच माणसं ही शांततेला घाबरतात. रम्य पावसाचा आनंद घ्यायचा हे देखी त्यांच्या गावी नसतं, त्याविषयी बोलताना मिलिंद म्हणालेत, पावसाचा आनंद घेणारे खूपच कमी लोकं माझ्या परिचयाचे आहेत, उन्हाळ्यात घामाच्या धारा वाहत असताना पावसाची आतुरतेने वाट बघणारे , पाऊस पडत असताना मात्र, त्याचा खूप कंटाळा आला असं म्हणणारे कित्येक लोक माझ्या परिचयाचे आहेत. आपण सगळे शहरात राहणारी माणसं किंवा आजकालची इन जनरलच माणसांच्या आयुष्याचं काहीतरी गणित चुकलं आहे का असं वाटायला लागतं. खूपशा माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळणार कठीण आहे,