मुंबई, 10 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मराठी मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील कलाकारांसुद्धा एक नवी ओळख मिळाली आहे. मालिकेतील अरुंधतीपासून ते अनिरुद्धपर्यंत सर्वच कलाकारांचा एक खास चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मालिकेत प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळींनी अनिरुद्धची भूमिका साकारली आहे. मिलिंद गवळी हे मालिकेशिवाय सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असतात. ते सतत सेटवरील व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. मिलिंद गवळी नेहमीच सोशल मीडियावर विविध किस्से आणि अनुभव शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची भरभरुन दाद मिळत असते.आजही असंच काहीसं झालं आहे. नुकतंच मिलिंद गवळींनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. खरं तर हा, ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरील एक बीटीएस व्हिडीओ आहे.हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी आपल्या सह कलाकारांचं कौतुक केलं आहे. सोबतच मालिका यशस्वी असण्यामागचं कारणही सांगितलं आहे. मिलिंद गवळी पोस्ट- आप्पांच्या अंगात ताप होता, अंगात कणकण होती, थकवा आला होता, त्यांना बसता सुद्धा येत नव्हतं, त्यांना खूपच त्रास होत होता, गोळ्या औषध घेऊन सुद्धा दोन-तीन दिवस तो ताप उतरत नव्हता, कणकण थांबत नव्हती,पण ते शूटिंग करत होते,कारण एपिसोड जायचा होता ,आपण शूटिंग केलं नाही तर एपिसोड अडकेल.“आई कुठे काय करते " यशस्वी होण्याचा एक कारण हे पण आहे की कलाकार जीव ओतून काम करतात,आपल्या कामावर अतोनात प्रेम करतात,काही महिन्यापूर्वी किशोरजी एक सीन करत होते आणि त्यांच्या घरून फोन आला की त्यांच्या वडिलांचं निधन झालं आहे, सोलापूरला लगेच निघावं लागणार आहे, डायरेक्टर @ravikarmarkar रवी करमरकर म्हणाले की आप्पा तुम्ही ताबडतोब निघा, पण आप्पांनी सीन पूर्ण करायचा निर्णय घेतला, वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर एक विनोदी सीन करणं किती यातना देणारं असू शकतं याची कल्पना करणं खूप कठीण आहे.
(हे वाचा: ‘धर्मवीर’ फेम प्रसाद ओक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, काय आहे कारण? ) या पावणेतीन वर्षांमध्ये बहुतेक सगळ्या कलाकारांनी आणि “आई कुठे काय करते” च्या टीम ने शारीरिक ,मानसिक ,कौटुंबिक समस्या बाजूला ठेवून खूप कठीण परिस्थितीमध्ये शूटिंग पूर्ण केलं आहे.बरं या गोष्टींचा बाऊ न करता, त्याची सहानुभूती न घेता, हे जे काय काम आहे ते प्रामाणिकपणे करत राहणे, कामालाच महत्त्व दे राहाणे .आपल्या मुळे 80 लोकांच्या युनिटला त्रास होऊ नये, त्यांचं नुकसान होऊ नये, हे एक खूप महत्त्वाचं कारण असतं.हे सगळं हसत खेळत मस्ती करत चाललेलं असतं.हा जो बीटीएस BTS मी शूट केला आहे त्याच्याने तुम्हा प्रेक्षकांना थोडासा अंदाज येईल.” दुनिया मे रहना है तो काम कर प्यारे "