मुंबई, 13 जुलै : आई कुठे काय करते मालिकेत सध्या ट्विस्टवर ट्विस्ट येत आहेत. मालिकेत अनिरुद्धचं वागणं दिवसेंदिवस विचित्र होत चाललं आहे. अनिरुद्धच्या वागण्याने घरातील सगळ्यांना त्रास होत आहे. संजनाशी लग्न करण्यासाठी आधी अरुंधतीला घटस्फोट दिला. लग्नानंतर संजनाशी देखील तो व्यवस्थित वागत नाही. एक लग्न मोडलेलं असताना अनिरुद्धचं दुसरं लग्न देखील मोडण्याच्या वाटेवर आहे. संजना देखील अनिरुद्धला वैतागली आहे. फक्त देशमुखांच्या घरातील माणसांसाठी संजना तिथे थांबलेली आहे. याच नोटवर मालिका नवं वळणं घेणार आहे. इथे सासूच आपल्या सुनेला माझ्या मुलाला सोडून जा असं सांगताना दिसणार आहे. आई कुठे काय करते मालिकेच्या येणाऱ्या भागात काय घडणार पाहूया. मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं की, अनिरुद्ध वीणाच्या मोबाईल चोरीचा खोटा आरोप नितीनवर लागतो. अरुंधती आणि आशुतोषमध्ये भांडणं लावतो. या सगळ्यावर कहर म्हणजे देशमुखांच्या घरी असताना अनिरुद्ध नितीनवर घाणेरडे आरोप करतो जे एकून अरुंधतीचं डोकं फिरतं आणि ती सगळ्यांसमोर अनिरुद्धच्या कानाखाली वाजवते. अहंकारी अनिरुद्ध तरीदेखील शांत राहण्याचं नाव घेत नाही. अनिरुद्धचं हे विचित्र वागणं पाहून देशमुख कुटुंबातील सगळेच वैतागले आहेत. हेही वाचा - ‘तुम्ही काय चाबूक काम केलंय…’ महाराष्ट्राच्या आईने केलं बाईपण भारी देवाच्या टीमचं तोंडभरून कौतुक मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की, अनिरुद्धच्या विचित्र वागण्यामुळे देशमुखांच्या घरी तमाशा होतो. या भांडणांनंतर अनिरुद्ध रागाने त्याच्या खोलीत निघून जातो. तर अरुंधती आणि आशुतोष त्यांच्या घरी जातात. देशमुखांच्या घरी सगळेच या भांडणांतर टेन्शनमध्ये आलेले असतात. इकडे संजना मात्र खूपच भावूक होते. अनघाजवळ संजना आपलं मन मोकळं करते. “ज्या अनिरुद्धवर मी प्रेम केलं होतं तो हाच आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये. विचार केला तरी मला त्या माणसाची किळस वाटायला लागली आहे”, असं संजना म्हणते.
संजना आणि अनघा बोलत असताना त्यांचं बोलणं कांचन ऐकते. तिला देखील हे ऐकून वाईट वाटतं. कांचनाच्या डोळ्यातही पाणी येतं आणि ती भावूक होत संजनाला म्हणते, “मी आई आहे अनिरुद्धची. मनात असलं तरी मी माझ्या लेकराला सोडून नाही जाऊ शकतं. पण तू त्याला सोडून जा”. कांचनचं हे वाक्य ऐकून संजना खूप शॉक होतं. इतके दिवस कांचन अनिरुद्ध आणि संजना यांच्या घटस्फोटाच्या विरोधात असते संजनाचं चुकतेय असं तिला वाटत असतं. पण अनिरुद्धच्या विचित्र वागण्यानंतर ती देखील आता सूनेच्या पाठिशी उभी राहताना दिसतेय. मालिकेच्या येणाऱ्या भागात काय घडणार? अनिरुद्ध आणि संजना घटस्फोट घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.