मुंबई, 07 जुलै : आई कुठे काय करते मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत आतापर्यंत अनिरुद्ध अरुंधतीच्या संसारात विश कालवण्याचा एकही चान्स सोडत नव्हता. पण अरुंधतीने नेहमीच त्याचे सगळे डाव उधळून लावले आहेत. पण थांबेल तो अनिरुद्ध कसला. मालिकेत सध्या वीणाच्या हरवलेल्या फोनवरून चांगलाच गदारोळ सुरू आहे. अशातच आता अनिरुद्धमुळे आशुतोष आणि नितीन यांच्या मैत्रीत खटके उडणार आहेत. जिवाला जीव देणारे मित्राला आशुतोष कानाखाली वाजवताना दिसणार आहे. मालिकेच्या येणाऱ्या भागात नेमकं काय घडणार आहे पाहूयात. मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं की अनिरुद्ध वीणाचा फोन चोरतो. त्यानंतर अनिरुद्ध आणि नितीला आपल्यावर संशय असल्याचं कळल्यानंतर अनिरुद्ध वीणाचा फोन नितीच्या ड्रॉवरमध्ये लपवून ठेवतो. इतके वीणाकडून फोन नंबर घेऊन 24 तासात तुझा मोबाईल शोधून देतो असं आश्वासन देतो. अनिरुद्धच्या या सगळ्या हालचाली संशयास्पद आहेत हे अरुंधती आणि नितीनच्या आधीच लक्षात आलेलं असतं मात्र अनिरुद्ध तिथेच डाव साधतो. हेही वाचा - एक्स पत्नीच्या संसारात आग लावण्यात अनिरुद्ध यशस्वी? अरुंधती-आशुतोषमध्ये कडाक्याचं भांडणं
अनिरुद्ध मी वीणाच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असून ते फोन ऑफिसमध्ये असल्याचं सांगतो. त्यानंतर “वीणाचा फोन ज्या कोणत्या माणसाकडे सापडेल त्या माणसाला मी स्वत: पोलिसांच्या हाती देईल” असं आशुतोष म्हणतो. मालिकेच्या आजच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे ज्यात अनिरुद्ध दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये येऊन वीणाच्या जुन्या नंबरवर फोन करतो. नितीनच्या ड्रॉव्हरमधून फोनचा आवाज येतो. वीणा ड्राव्हर उघडते तोच तिला फोन दिसतो. हा माझा फोन हे असं म्हणत हा फोन नितीनच्या ड्रॉव्हरमध्ये सापडल्याचं सांगते. त्यानंतर अनिरुद्ध नितीनकडे जाऊन “तुझा खरा चेहरा मला सर्वांसमोर आणायचा होता” असं द्वेषाने सांगतो. तोच नितीन अनिरुद्धची कॉलर धरतो. तर इकडे आशुतोष प्रचंड चिडलेल्या अवस्थेत नितीनला स्वत:कडे ओढून सानकन त्याच्या कानाखाली लगावतो. आशुतोषने आपल्या जिवलग मित्राच्या इतक्या रागाने कानाखाली मारल्याचं पाहून सगळ्यांना धक्का बसतो.
आशुतोष आणि अरुंधतीच्या आयुष्यात वीणाच्या येण्याने सगळीच समीकरण हळू हळू बदलू लागली आहेत. अनिरुद्धने खेळलेल्या या खेळाने आशुतोष आणि नितीन या दोन मित्रांच्या मैत्रीत येणार का? की अनिरुद्धचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल हे पाहणं येणाऱ्या भागात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.