जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / एक्स पत्नीच्या संसारात आग लावण्यात अनिरुद्ध यशस्वी? अरुंधती-आशुतोषमध्ये कडाक्याचं भांडणं

एक्स पत्नीच्या संसारात आग लावण्यात अनिरुद्ध यशस्वी? अरुंधती-आशुतोषमध्ये कडाक्याचं भांडणं

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते मालिकेत वीणाच्या हरवलेल्या मोबाईलचं प्रकरण सुरू आहे. नेमकं काय घडणार आजच्या भागात पाहूया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 जुलै : आई कुठे काय करते मालिकेचं कथानक सध्या वीणा आणि तिच्या हरवलेल्या मोबाईलच्या भोवती फिरतंय. वीणाचा मोबाईल अनिरुद्ध चोरतो आणि तिला दुसऱ्या नंबरवरून ब्लॅक मेक करण्याचा प्रयत्न करत असतो. मालिकेत सध्या वीणा फार भावनिक प्रसंगाचा सामना करत आहे. त्यात तिला खंबीर राहण्यासाठी अरुंधतीची साथ मिळतेय. वीणाने अरुंधतीला तिच्या आयुष्याबद्दल सगळं काही सांगून टाकलं आहे. पण ही गोष्ट आशुतोषला न सांगण्याची अट मात्र वीणा अरुंधतीला घालते आणि आता याचाच फायदा अनिरुद्ध घेताना दिसतोय. मालिकेच्या येणाऱ्या भागात अरुंधती आणि आशुतोष यांच्यात कडाक्याच भांडण होणार आहे. नेमकं काय घडणार आजच्या भागात पाहूया. मालिकेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की अरुंधती आणि नितीन बोलत असताना अनिरुद्ध त्यांचं सगळं बोलणं ऐकतो. अरुंधती आणि नितीन या दोघांना अनिरुद्धवर संशय असतो. त्यात वीणा देखील अनिरुद्धला तिच्या हरवलेल्या मोबाईलबद्दल सांगते त्यामुळे दोघांचा अनिरुद्धवरील संशय आणखी बळावतो. आता हे सगळं अनिरुद्धला कळल्यानंतर तो नवा डाव आखून अरुंधती आणि आशुतोषच्या संसारात मीठाचा खडा टाकतो. हेही वाचा -  अखेर दुसऱ्या बायकोनंही सोडली साथ; पहिली बायको वाजवणार कानाखाली, अनिरुद्धचं कारस्थान उघड इकडे अरुंधती नितीला सांगत असते की आशुतोषला वीणाच्या भूतकाळाबद्दल आणि हरवलेल्या मोबाईलबद्दल सगळं सांगायला हवं. नेमकं हेच डोक्यात ठेवून अनिरुद्ध वीणाचा फोन नितीच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवतो आणि दुसरीकडे वीणाकडून मोबाईलचा नंबर मिळवून 24 तासात त्या माणसाला तुझ्यासमोर हजर करतो असं आश्वासन देतो.

जाहिरात

मालिकेच्या येणाऱ्या भागाचा प्रोमो समोर आलाय ज्यात अनिरुद्ध केळकरांकडे येऊन सांगतो, “मित्राच्या मदतीने मी वीणाच्या जुन्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलंय.  वीणाला त्रास देणारा माणूस आशुतोषच्या ऑफिसमध्येच आहे”.  त्यावर नितीन, “अनिरुद्धची माहिती खरी असेल तर नक्की काय घडतंय हे आपण शोधायला हवं”, असं सांगतो. “जर ही माहिती खरी असेल तर त्या माणसाला मी स्वत:च्या हाताने पोलिसात देईन”, असं आशुतोष ठणकावून सांगतो.

News18लोकमत
News18लोकमत

अनिरुद्धमुळे आशुतोषला वीणाच्या मोबाईलबद्दल कळतं आणि तो अरुंधती आणि नितीनवर चिडतो.  अरुंधतीला “माझ्यापासून काहीही लपवून ठेवू नका” असं बजावनू सांगतो. दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडणं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात