मुंबई, 18 जून: आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte) मालिकेत सध्या अरुंधती ( Arundhati) तिच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं प्रवास करत आहे. आशुतोषच्या मदतीनं अरुंधतीनं गाण्यामध्ये हळूहळू आपलं करिअर करायला सुरुवात केली आहे. अरुंधतीच्या आवाजात तिनं दोन गाणी देखील रेकॉर्ड केली. एवढचं नाही तर अरुंधतीनं आता कॉलेजमध्ये देखील अँडमिशन घेतलं असून ती ईशाबरोबर कॉलेजला जाणार आहे. अरुंधतीच्या स्वबळावर तिची राहून गेलेली स्वप्न पूर्ण करत आहे. तिच्या बकेट लिस्ट एक एक गोष्टींनी पूर्ण होत आहे. तिच्या बकेट लिस्टमधील आणखी गोष्ट म्हणजे तिचा विमान प्रवास. अरुंधती पहिल्यांदाच विमानभरारी घेणार आहे. मालिकेच्या येत्या भागात कामानिमित्त अरुंधतीला महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचा योग येणार आहे. मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला असून अरुंधतीला कामानिमित्त इंदौरला जावं लागणार आहे. प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे आशुतोषचा अरुंधतीला फोन येतो. तो तिला ‘एकटी इंदौरला नीट जाशील ना. मी तुझे नितीनला उद्याचे फ्लाइटचे तिकिट काढायला सांगतो’, असं म्हणतो. आशुतोषचा फोन येतो तेव्हा अरुंधती देशमुखांच्या घरात असते. तेव्हा तिथे ती तिच्या विमान प्रवासाची बातमी घरच्यांना देते. या बातमीनं आप्पा आणि अनघा फारच खूश होतात. अनघा अरुंधतीला ‘आता तुझ्यासमोर असे प्रसंग येत राहतील, तुला हे सारं जमेल आणि प्रत्येक प्रवासात आपण काहीना काही शिकत असतो’, असं म्हणतं तिला आत्मविश्वास देते.
हेही वाचा - मी तीन दिवस सलग झोपलो नाहीये! नुकतचं लग्न झालेल्या अभिनेता विराजसची पोस्ट चर्चेत अरुंधतीचं विमानानं प्रवास करण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पण हा मुंबई-इंदौर विमान प्रवास अरुंधतीला एकट्यानं करायचा आहे. आता तो ती कसा करणार हे पाहणे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. तसंच अनिरुद्ध आणि संजना यामध्ये काहीतरी बोलून विघ्न आणणार नाही ना हे ही पाहणं महत्त्वाचं ठरेल. आशुतोष अरुंधतीच्या आयुष्यात आल्यापासून अरुचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. आशुतोष नेहमीच तिला नव्या गोष्टी करायला प्रोत्साहित करत असतो. आता मुंबई -इंदौर हा प्रवास अरुंधती कसा करणार? ती या प्रवास कोणत्या गोष्टी शिकणार? हे सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी मलिका पाहणं महत्वाचं ठरेल.