मुंबई, 18 जून: माझा होशील ना ( Majha Hoshil Na) म्हणत जिनं त्याच्या गळ्यात वरमाळा घातल्या तो अभिनेता म्हणजे सर्वांचा लाडका विराजस कुलकर्णी ( Virajan Kulkarni) विराजस आणि शिवानी रांगोळे ( Shivani Rangole) यांनी नुकतचं लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी कोणताही वेळ न घालवता कामाला लागले आहेत. दोघेही आपापल्या कामात व्यस्त असले तरी एकमेकांना क्वॉलिटी टाईम द्यायला विसरत नाहीत. मात्र यासगळ्यात विराजस गेली 3 दिवस झोपलाच नाहीये. असं आम्ही तर स्वत: विराजस म्हणत आहे. विराजस सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. नेहमीच तो त्याच्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी शेअर करत असतो. (Virajan Kulkarni New Post) नुकतीच त्यानं एक पोस्ट शेअर केली ज्यात त्यानं मी गेली तीन दिवस झोपलोच नाहीये असं म्हटलंय. विराजसची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी वेगवेगळे तर्क लावले आहेत. विराजसचं नुकतचं लग्न झाल्यानं तो शिवानीबरोबर क्वॉलिटी टाईम घालवत असल्यानं त्याला झोपायला मिळालं नसेल असा अंदाज लावला गेलाय. विराजसच्या पोस्टवरही अनेकांनी कमेंट करत त्याची खिल्ली उडवली आहे. एका युझरनं म्हटलंय, ‘लग्न झालं आता तुझं, आता असचं होणार’.
हेही वाचा - अभिनेत्री पूजा सावंतनं खरेदी नवं घर, बेस्ट फ्रेंड अभिनेत्यानं शेअर केला VIDEO आता विराजस तीन दिवस का झोपू शकला नाहीये हे त्यानं त्याच्या पोस्टच्या पुढच्या वाक्यात म्हटलंय. विराजसनं लिहिलंय, ‘मी तीन दिवस सलग झोपलो नाहीये, कारण अधून मधून उठावं लागतं’. विराजसच्या या पोस्टनं सर्वांना हसू आलं आहे. आता विराजसनं लिहिलेल्या पोस्टचा आपण लावू तसा अर्थ लावता येईल. विराजस तीन दिवस सलग (झोपेतून मध्येच न उठता) झोपला नाहीये की सलग तीन दिवस झोपला नाहीये हे काही कळू शकलेलं नाही. विराजसच्या या पोस्टवर एका युझरनं त्याचं ‘कॅप्शन किंग’ म्हणत कौतुक केलं आहे. पोस्टसह विराजसने वर्क मोडमधला फोटो शेअर केला आहे. फ्लोरल प्रिंट असलेला शर्ट, स्पेक्ससह विराजसनं फोटो शेअर केला आहे. विराजस आणि शिवानी यांनी 4 मेला लग्न केलं. लग्नाला एक महिना पूर्ण होताच त्यांनी लग्नाचा एक धम्माल व्हिडीओ शेअर केला होता. त्याचीही खूप चर्चा पाहायला मिळाली. विराजसच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचं झालं तर नुकताच विराजसच्या ‘मिकी’ या 2 अंकी विनोदी नाटकाचा प्रयोग पुण्यात पार पडला. या नाटकात विराजसनं सखाराम चव्हाण हे पात्र साकारलं आहे. तर शिवानीच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचं तर शिवानीची नेटफ्लिक्सवर एक नवी ‘शी’ नावाची एक सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.