मुंबई, 12 एप्रिल- ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. या मालिकेचं कथानंक अरुंधतीभोवती फिरताना दिसत आहे. अरुंधतीनं आशुतोषसोबत लग्न करून नव्याने आयुष्याला सुरूवात केली आहे. तिच्या या निर्णयाला प्रेक्षकांनी देखील पाठींबा दर्शवला आहे. मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारताना दिसते. या मालिकेनं मधुराणीला महाराष्ट्राच्या घराघरात तर पोहचवलं आहे पण प्रेक्षकांच्या मनात देखील स्थान दिलं आहे. मधुराणीबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक असतात. मधुराणीनं नुकतचं एक इन्स्टा रील करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तिचं हे रील सोशल मीडियावर चांगलचं चर्चेत आलं आहे. मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतचं तीन एका ट्रेंडवर रील करण्याचा प्रयत्न केला आहे. हे रील करत तिनं म्हटलं आहे की, rending reel करायचं आयुष्यातलं पाहिलं temptetion…! तिच्या या रीलचं चाहत्यांनी देखील कौतुक केलं आहे. एकानं म्हटलं आहे की, मस्तचं आरू तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की,सो क्यूट..तर एकानं तू अशा रीलमध्ये अडकू नकोस असा काहीसा सल्ला देखील दिला आहे. वाचा- ‘सगळं जग फिरलं तरी…’ क्रांतीनं शेअर केला आईच्या हातच्या जेवणाचा खास VIDEO मधुराणीला प्रेक्षक अरुंधती म्हणूनच ओळखतात. खरं तर ही तिच्या अभिनयाची पोहचपावतीच म्हणावी लागेल. मालिकेती साधी आणि सोज्वळ अरुंधती सर्वांनाच आवडते. मधुराणी देखील अरुंधतीप्रमाणेच साधी राहते. मधुराणीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. वाचा- मोठी बातमी! ‘या’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त गंभीर जखमी मधुराणी चं लग्न दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांच्याशी 9 डिसेंबर 2003 झालं.या कपलला एक मुलगीही आहे. तिचं नाव स्वरा आहे. मधुराणी मुलीसोबतचे व्हिडिओ व फोटो शेअर करत असते.अभिनेत्री मधुराणीनं आई कुठे काय करते या मालिकेपूर्वी ‘इंद्रधनुष्य’,‘असंभव’ या मालिकेतही काम केले आहे. तर ‘सुंदर माझं घर’, ‘गोड गुपित’, ‘समांतर, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘मणी मंगळसूत्र’ यांसारख्या मराठी सिनेमातही आपल्या अदाकारीने रसिकांची मनं जिंकली आहे. मधुराणीनी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून जवळपास 10 वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक केले आहे.
आई कुठे काय करते ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेनं टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सोशल मीडियावर सतत मालिकेची चर्चा असते. मालिका अनेकजा कथानकातील बदलामुळे ट्रोल देखील होती. अरुंधतीच्या लग्नाचा निर्णय काही नेटकऱ्यांना रुचला नव्हता. काहींनी मात्र या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. या मालिकेच्या माध्यमातून लेखकाने एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केले आहे.
आई कुठे काय करते ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेनं टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सोशल मीडियावर सतत मालिकेची चर्चा असते. मालिका अनेकजा कथानकातील बदलामुळे ट्रोल देखील होती. अरुंधतीच्या लग्नाचा निर्णय काही नेटकऱ्यांना रुचला नव्हता. काहींनी मात्र या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. या मालिकेच्या माध्यमातून लेखकाने एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केले आहे.