जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / साध्याभोळ्या अरुंधतीचा ग्लॅमरस अवतार! मधुराणीचा नवा लूक पाहून चाहते जोमात

साध्याभोळ्या अरुंधतीचा ग्लॅमरस अवतार! मधुराणीचा नवा लूक पाहून चाहते जोमात

साध्याभोळ्या अरुंधतीचा ग्लॅमरस अवतार!

साध्याभोळ्या अरुंधतीचा ग्लॅमरस अवतार!

आई कुठे काय करते मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर आहे. अरुंधती आणि आशुतोषचं नुकतचं लग्न झालं आहे. दोघांनी नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे. अशातच साध्याभोळ्या अरुंधतीचा ग्लॅमसरस अंदाज समोर आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

  मुंबई, 3 एप्रिल- आई कुठे काय करते मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर आहे. अरुंधती आणि आशुतोषचं नुकतचं लग्न झालं आहे. दोघांनी नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे. अशातच साध्याभोळ्या अरुंधतीचा ग्लॅमसरस अंदाज समोर आला आहे. अरुंधतीच्या या नवीन लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली आहे. आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीची भूमिका मधुराणी गोखले प्रभुलकर साकारताना दिसते. मधुराणीनं तिचे नवीन लूकमधील काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले असते. तिचं हा ग्लॅम अवतार चाहत्यांना देखील आवडला आहे. पण हा लूक अरुंधतीचा नसून मधुराणीचा आहे, असचं वाटत आहे. चाहत्यांनी मात्र अरुंधतीचा लूक बदला असं सांगून टाकलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अरुंधतीचा असा ग्लॅम अवतार पाहायला मिळणार का असा देखील सर्वांना प्रश्न पडला आहे. वाचा- महाराष्ट्रतील पहिल्या तृतीयपंथीय अभिनेत्रीनं सांगितला ‘तो’ अनुभव, पाहा Video मधुराणी गोखले सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. मालिकेसंबंधी काहे अपडेट, तिचे लेटेस्ट फोटो याबद्दलची माहिती देखील ती शेअर करताना दिसते. आता देखील तिनं तिचे सुंदर लाल साडीमधील फोटो शेअर केले आहे. या साडी ती खूपच सुंदर दिसत आहे. नेहमी आपण तिला मालिकेत साडीत पाहतोच पण तिचा या साडीत ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. मोकळे केल, सिल्कची साडी, तिही वनसाई़ड पिनअप केलेली..यामुळं मधुराणीचा पूर्ण लूकचं बदलला आहे. चाहत्यांनी तर तिच्या या लूकच्या कौतुकं केलं आहे.

जाहिरात

कोणी सुंदर तर कोणी अप्रितम तर कोणी रुपसुंदरी म्हणत मधुराणीच्या चेहऱ्यावरील हास्यचं कौतुक केलं आहे. एका चाहत्यानं म्हटलं आहे की, स्वामींनी दामींनी सुंदर सुरेख अप्रतिम सोनपरी लयभारी सुपरस्टार कौतुक करावं तेवढं कमीच नारी तू नारायणी राजराजेश्वरी नारीशक्ती तुझे सलाम 👸🙏🌹❣️⭐तर आणखी एकानं म्हटलं आहे की, नावाप्रामाणेच गोड दिसत आहात. अशाच एका चाहत्यांने म्हटलं आहे की, आई खूप छान दिसताय..तर एकानं म्हटलंय की, मधुर आती मधुर..अशा असंख्य कमेंटच्या मधुराणीच्या या फोटोंवर आल्या आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

आई कुठे काय करते ही मालिका अरुंधती भोवताली फिरताना दिसते. मालिकेतीचा अरुंधतीचा एक गृहिणी..आई असा होता. ती सुरूवातीपासून दुसऱ्यांचा विचार करत आली आहे. तिचा विचार कधी कोणी केलाच नाही.पण आता तिच्या या नवीन जगात तिचा जवळचा मित्र असलेला तिचा नवरा तिचा पहिला विचार करताना दिसतो. तिच्या स्वप्नांचा विचार करताना दिसतो. त्यामुळं अरुंधतीचं आयुष्य आता खऱ्या अर्थानं बहरलं आहे. पण येणाऱ्या काळात अनिरुद्ध यात कुठला मोडा घालणार नाही ना, याची देखील चिंता चाहत्यांना वारंवार सतावत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात