जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीला लागली भविष्यातील 'त्या' संकटाची चाहूल; वाढदिवशीच संजनासोबत घडणार असं काही

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीला लागली भविष्यातील 'त्या' संकटाची चाहूल; वाढदिवशीच संजनासोबत घडणार असं काही

आशुतोष आणि अरुंधतीचा सुखी संसार सुरु आहे. मात्र दुसरीकडे संजनाला तिचा संसार मोडताना दिसत आहे. मालिकेत आशुतोषची बहीण वीणाच्या एंट्रीमुळे सगळीच समीकरणं बदलली आहे.

आशुतोष आणि अरुंधतीचा सुखी संसार सुरु आहे. मात्र दुसरीकडे संजनाला तिचा संसार मोडताना दिसत आहे. मालिकेत आशुतोषची बहीण वीणाच्या एंट्रीमुळे सगळीच समीकरणं बदलली आहे.

आशुतोष आणि अरुंधतीचा सुखी संसार सुरु आहे. मात्र दुसरीकडे संजनाला तिचा संसार मोडताना दिसत आहे. मालिकेत आशुतोषची बहीण वीणाच्या एंट्रीमुळे सगळीच समीकरणं बदलली आहे. आता आता येणाऱ्या मालिकेत काय घडणार याविषयीची अपडेट समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 जूनआई कुठे काय करते या मालिकेची नेहमीच प्रचंड चर्चा असते. मालिकेत काय घडणार हे जाणून घेण्यासाठी  प्रेक्षक कायम उत्सुक असतात. मालिकेत सुरु असलेल्या कथानकामुळं सध्या सगळ्यांचंच लक्ष मालिकेवर वेधलं आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या अरुंधतीने पुन्हा एंट्री घेतली आहे. सध्या आशुतोष आणि अरुंधतीचा सुखी संसार सुरु आहे. मात्र दुसरीकडे संजनाला तिचा संसार मोडताना दिसत आहे. मालिकेत आशुतोषची बहीण वीणाच्या एंट्रीमुळे सगळीच समीकरणं बदलली आहे. आता  आता येणाऱ्या मालिकेत काय घडणार याविषयीची अपडेट समोर आली आहे. आई कुठे काय करते या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. एकीकडे अरुंधती आणि आशुतोष नवीन संसाराला सुरुवात करत आहेत तर दुसरीकडे अनिरुद्ध आणि संजनामध्ये दुरावा वाढतच चालला आहे. आता मालिकेत देशमुख कुटुंबीय लवकरच संजनाचा वाढदिवस साजरा करणार आहेत.  फक्त देशमुख कुटुंबीयच नाही तर अरुंधती आणि आशुतोष देखील संजनाला शुभेच्छा देण्यासाठी येतात.  पण या पार्टीमध्ये अनिरुद्धची अनुपस्थिती सगळ्यांनाच खटकते. तर दुसरीकडे अनिरुद्धमुळे मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट येणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आई कुठे काय करतेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार, देशमुख कुटुंबीय संजनाला सरप्राईज बर्थडे पार्टी देतात. ते पाहून संजना भारावून जाते. अरुंधती देखील आनंदानं संजनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. तेवढ्यात अनिरुद्ध तिथे केक घेऊन येतो. अनिरुद्ध तिच्यासाठी केक घेऊन आला आहे असा संजनाचा समज होतो. पण तिथे तो वीणाच्या कंपनीचा नवीन सीईओ झाल्याची घोषणा करतो. संजनाच्या बर्थडे पार्टीत अनिरुद्ध विनासोबत केक कापतो आणि तिला भरवतो. हे पाहून संजना भडकते. ती अनिरुद्धच्या ‘आज माझा वाढदिवस आहे आणि वीणा माझ्या जागी आहे’ असं म्हणत खडसावते. Madhu Mantena-Ira Trivedi: मसाबा गुप्ताच्या एक्स नवऱ्याने 48 व्या वर्षी बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ; दुसरी पत्नी करते हे काम ते पाहून अरुंधतीला तिचा भूतकाळ आठवतो. ती  वर्षांपूर्वी जे माझ्यासोबत घडलं तेच संजनासोबत घडतंय का असा विचार करते. त्यामुळे आता अनिरुद्धच्या आयुष्यात संजनाची जागा वीणा घेणार का, अनिरुद्ध आणि संजनाचा संसार मोडणार का हे पाहणं महत्वाचं आहे.

जाहिरात

आई कुठे काय करते’ मालिकेचं नवं कथानक सध्या चांगलच पसंत केलं जात आहे. मालिकेत आता अरुंधती आणि आशुतोषचं लग्नानंतरचं आयुष्य सुरु झालं आहे. या दोघांमध्ये हळूहळू प्रेम फुलत आहे. तर दुसरीकडे आशुतोष आपली बहीण वीणा आणि अनिरुद्धच्या वाढत्या जवळीकतेमुळे चिंतेत आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी नक्की काय घडणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात