जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 15 लोकांसमोर 'असा' शूट झाला न्यूड सीन, अभिनेत्रीनं केला खुलासा

15 लोकांसमोर 'असा' शूट झाला न्यूड सीन, अभिनेत्रीनं केला खुलासा

15  लोकांसमोर 'असा' शूट झाला न्यूड सीन, अभिनेत्रीनं केला खुलासा

सध्या सिनेजगतात दाक्षिणात्य सिनेमा ‘अदाई’ आणि त्यात अभिनेत्रा आमला पॉल हीनं दिलेल्या न्यूड सीनची खूप चर्चा सुरू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जुलै : एखाद्या सिनेमातील सीन मोठ्या पडद्यावरही खराखुरा भासावा यासाठी कलाकार काय काय करत नाहीत. पण अनेकदा काही इंटेंस सीन शूट करणं अभिनेता किंवा अभिनेत्रीसाठी खूपच कठीण जातं. त्यातकरून सर्वाधिक कठीण असतं ते एखाद्या सिनेमात न्यूड सीन देणं. सध्या एक अभिनेत्री एका सिनेमात न्यूड सीन दिल्यानं चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीनं तिच्या आगामी सिनेमात दिलेल्या या न्यूड सीनमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्रीनं या सीनविषयी सविस्तर चर्चा केली. जवळपास 15 लोकांच्या समोर अशाप्रकारचा सीन शूट करणं तिच्यासाठी किती कठीण होतं आणि याची तयारी तिनं कशी केली याविषयी तिनं या मुलाखतीत सांगितलं. सध्या सिनेजगतात दाक्षिणात्य सिनेमा ‘अदाई’ आणि त्यात अभिनेत्रा आमला पॉल हीनं दिलेल्या न्यूड सीनची खूप चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि ही अभिनेत्री एकाएकी प्रकाशझोतात आली. या ट्रेलरच्या शेवटी अवघ्या काही सेकंदाच्या न्यूड सीननं सर्वत्र खळबळ माजली. या ट्रेलरनंतर मात्र आमलावर कौतुकचा वर्षाव होऊ लागला. अर्थात हे कौतुक तिच्या अभिनयासाठीच होतं. पण त्यानंतर झालेल्या एका मुलाखतीत आमला हा सीन कसा शूट करण्यात आला याविषयीचा खुलासा केला. या सोबतच हा सीन 15 लोकांसमोर शूट करण्यात आल्याचंही तिनं सांगितलं. अक्षय कुमारच्या Mission Mangalचा टीझर पाहून फॅन म्हणाले, साहोसोबत रिलीज नको करू

आमला म्हणाली, ‘या सीनविषयी मी शूटिंगच्या आधी मी दिग्दर्शक रत्न कुमार यांच्याशी चर्चा केली होती. त्यांना मी या सीनविषयी फारशी चिंता करण्याचं कारण नाही असं जरी मी त्यांना सांगितलं असलं तरीही माझ्या मनावर खूप दडपण होतं. जेव्हा मी सेटवर पोहोचले त्यावेळीही मी दडपणाखाली होते. सेटवर काय चालू आहे. शूटच्या वेळी कोणकोण असेल तिथलं वातावरण कसं असेल या सर्व गोष्टी मनात सुरू होत्या.’ हॉरर सिनेमा पाहताना थिएटरमध्येच मृत्यू, शेवटपर्यंत कोणाला समजलंच नाही!

जाहिरात

आमला पुढे म्हणाली, ‘या सीनच्या शूटिंगसाठी एक बंद सेटची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी सेटवर फक्त 15 लोक उपस्थित होते. ‘अदाई’चे दिग्दर्शक रत्न कुमार आणि सेटवरील सर्व मंडळी यांच्यावर जर माझा विश्वास नसता तर मी हा सीन कधीच शूट करू शकली नसते.’ या सिनेमाच्या अगोदर आमला सिने इंडस्ट्री सोडण्याच्या तयारीत होती. तिला ज्या सिनेमाच्या ऑफर्स आल्या होत्या त्या सर्व रेप आणि त्यासंबंधी न्याय मिळवून देणाऱ्या कथानकावर आधारित असलेल्या स्क्रिप्ट असत आणि अशा प्रकारच्या भूमिका तिला साकारायच्या नव्हत्या. Sacred Games 2 Trailer गणेश गायतोंडे परत आलाय, सरदारजीला सांगितलं मोठं सिक्रेट! =========================================================================== EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात