हॉरर सिनेमा पाहताना थिएटरमध्येच मृत्यू, शेवटपर्यंत कोणाला समजलंच नाही!

‘अ‍ॅनाबेला कम्स होम’ बद्दल बोलायचं तर हा सिनेमा एका सत्य कथेवर आधारित असल्याचं बोललं जातं.

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2019 02:02 PM IST

हॉरर सिनेमा पाहताना थिएटरमध्येच मृत्यू, शेवटपर्यंत कोणाला समजलंच नाही!

थायलंड, 9 जुलै : हॉलिवूडमधील हॉरर सिनेमा ‘अ‍ॅनाबेला कम्स होम’ मगच्या महिन्यात म्हणजेच 26 जुलैला रिलीज झाला होता. जगभरात सर्वत्र या सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या सिनेमाशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हा हॉरर सिनेमा पाहताना एका व्यक्तीचा थिएटरमध्येच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि त्याहून चकीत करणारी गोष्ट म्हणजे सिनेमा संपेपर्यंत त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कोणालाही समजलं नव्हतं.

रिपोर्टनुसार ही घटना थायलंडमध्ये घडली आहे. ‘अ‍ॅनाबेला कम्स होम’ पाहायला आलेल्या एका 77 वर्षीय ब्रिटिश नागरिक बर्नार्ड चॅनिंग या इसमाचा थिएटरमध्येच मृत्यू झाला. बर्नार्ड व्हेकेशनसाठी थायलंडला गेला होता. या ठिकाणी तो ‘अ‍ॅनाबेला कम्स होम’ पाहण्यासाठी गेला होता. जेव्हा सिनेमा संपला आणि लाइट्स लावल्यानंतर त्याच्या बाजूला बसलेल्या महिलेच्या ही बाब लक्षात आली. यामुळे त्या महिलेला खूप मोठा धक्का बसला आहे. बर्नार्डला मृतावस्थेत पाहिल्यावर त्या महिलेनं आरडाओरडा केला त्यानंतर हा मृतदेह अ‍ॅम्बुलन्सच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं. मात्र या सिनेमामुळेच बर्नार्डचा मृत्यू झाला की यामागे काही वेगळं कारण होतं याचा अद्याप खुलासा झालेला नाही.

Sacred Games 2 Trailer गणेश गायतोंडे परत आलाय, सरदारजीला सांगितलं मोठं सिक्रेट!

Comicbook.com एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, प्रवेश द्वारावर काही लोकांना बोलताना त्यानं ऐकलं की, थिएटरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यामुळे सर्व लोकांना खूप धक्का बसला आहे. काही लोक मृत व्यक्तीच्या बाजूला बसलेले होते. त्यामुळे या प्रकारामुळे थिएटरमधील कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. याआधी 2016 मध्ये भारतातील ‘द कांजुरिंग 2’ पाहत असताना एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

Loading...

‘बडे अच्छे...’ फेम राम कपूरनं कमी केलं वजन, पाहा त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो

‘अ‍ॅनाबेला कम्स होम’ बद्दल बोलायचं तर हा सिनेमा एका सत्य कथेवर आधारित असल्याचं बोललं जातं. 1970 मध्ये अमेरिकेतील एका महिलेनं आपल्या मुलीसाठी एक बाहुली खरेदी केली होती. पण काही दिवसांनंतर ही बाहुली स्वतःहून हालचाल करू लागली. असं म्हटलं जातं की, अ‍ॅनाबेला नावाच्या एका मुलाचा आत्मा या बाहुलीमध्ये गेला होता.

अक्षय कुमारच्या Mission Mangalचा टीझर पाहून फॅन म्हणाले, साहोसोबत रिलीज नको करू

===========================================================================

EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...