मुंबई, 30 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राने (Sanya Malhotra) आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप कमी काळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज सान्याचे लाखो चाहते आहेत. अलीकडेच सान्या मल्होत्रा ‘डान्स दिवाने’ (Dance Diwane) या डान्स रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये पाहुणी (Guest) म्हणून गेली होती. यादरम्यान तिने कोरियोग्राफर धर्मेश येलांडेसोबत (Choreographer Dharmesh Yelande) एक किस्सा सांगितला आहे. ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सान्याने त्या गोष्टीची आठवण करून दिली जेव्हा कोरियोग्राफर धर्मेशने तिला रिजेक्ट (Reject) केलं होतं. सध्या डान्स रिअॅलिटी शोचा जज असणाऱ्या धर्मेशने सहा वर्षांपूर्वी अभिनेत्री सान्या मल्होत्राला रिजेक्ट केलं होतं. त्यावेळी सान्या नुकतीच चित्रपट सृष्टीत आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत होती. त्यासाठी दिलेल्या ऑडिशनमध्ये धर्मेशने सान्याची निवड केली नव्हती. त्या दिवसाची आठवण करून देताना सान्या म्हणाली की, “आज माझ्या आयुष्यातील एक चक्र पूर्ण झालं आहे. 6 वर्षांपूर्वी मी एका डान्स रिअॅलिटी शोच्या ऑडिशनसाठी याच स्टुडिओमध्ये आले होते. पण त्यावेळी ते ऑडिशन मला पास करता आलं नाही.’ (हे वाचा- माहिरा खान ते सबा कमर या पाकिस्तानी अभिनेत्री बॉलीवूडमध्ये नाही उमटवू शकल्या ठसा ) यावेळी अभिनेत्रीने रिजेक्ट होण्याचं कारणही सांगितलं आहे. ती पुढे म्हणाली की, ‘मला आठवतंय, त्या रात्री 1 वाजता मी ऑडिशनमधून फ्री झाली होती. पण तुमच्यामुळे मी ऑडिशन पास करू शकली नाही. पण आता मी माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी याठिकाणी आली आहे.’ हा किस्सा ऐकल्यानंतर कोरियोग्राफर धर्मेशही अवाक् झाला. त्याने सान्याच्या परिश्रमाचं कौतुक केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.
(हे वाचा- ‘सुशांतमुळेच मला सिनेमाच्या ऑफर्स येऊ लागल्या’, TV कलाकाराने केला खुलासा ) धर्मेश पुढं असंही म्हणाला की, ‘जी लोकं रिजेक्शनचा सामना करून आयुष्यात पुढे वाटचाल करत आहेत, अशा सर्वांसाठी तु एक उत्कृष्ट उदाहरण आहेस.’ सान्या मल्होत्राचा ‘पग्गलेट’ नावाचा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन उमेश बिस्त यांनी केलं आहे.