मीरा ने 2005 साली सोनी राझदानच्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट 'नजर' मधून डेब्यू केला होता. चित्रपटात अश्मित पटेल सोबत तिने काम केलं होतं. त्यानंतर मीरा ने लकी अली सोबत 'कसक' मधे काम केल होतं, जो एक थ्रिलर चित्रपट होता. 2012 मधे आलेला बोल्ड चित्रपट 'पांच घंटे मैं पांच करोड़' मधेही ती दिसली होती.
अभिनेत्री आणि गायिका सलमा आगा यांनी 80 ते 90 च्या दशकात बऱ्याच बॉलीवूड चित्रपटांत अभिनय केला होता. 1982 साली आलेला 'निकाह' मधून त्यांनी बॉलीवूड मधे पदारपण केलं होत. यानंतर सलमा यांनी 'कसम पैदा करने वाले की', 'सलमा', 'ऊंचे लोग', 'जंगल की बेटी', 'पांच फौलादी', 'महावीरा', 'कंवरलाल', 'पति, पत्नी और तवायफ' अशा चित्रपटांत काम केलं.