Home /News /entertainment /

'सुशांत, तुझ्यामुळेच आम्हाला सिनेमाच्या ऑफर्स येऊ लागल्या', TV कलाकाराने केला खुलासा

'सुशांत, तुझ्यामुळेच आम्हाला सिनेमाच्या ऑफर्स येऊ लागल्या', TV कलाकाराने केला खुलासा

फिल्म इंडस्ट्री ने अजूनही TV स्टार्सची फॅनफॉलोईंग लक्षात घेतलेली नाही, असं अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Chaudhary) ने म्हटलं आहे.

  मुंबई, 29 मार्च : रामायण (Ramayan), गीत (Geet – Hui Sabse Parayi) आणि पुनर्विवाह (Punar Vivah) अशा मालिकांमधून गुरमीतने (Gurmeet Chaudhary) आपली टीव्ही इंडस्ट्रीवर छाप सोडली आहे. तर झलक दिखला जा (Jhalak Dikhhla Jaa), नच बलिए (Nach Baliye), खतरोंके खिलाडी (Khatron Ke Khiladi) यासांरख्या रियॅलिटी शो मधून देखील तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याशिवाय त्याने खामोशियाँ (Khamoshiyan), वजह तुम हो (Wajah Tum Ho), लाली की शादी नें लड्डू दिवाना (Laali Ki Shaadi Mein Laaddoo Deewana) आणि पलटन (Paltan) या चित्रपटांमधेही काम केल आहे. पण अजूनही आपल्याला चांगली संधी मिळत नसल्याचं त्याला वाटत आहे. अनेक मल्टीस्टारर चित्रपटांत काम केल्यानंतर त्याचा सोलो चित्रपट येत आहे. ‘वाईफ’ (wife) असं या चित्रपटाचं नाव असून वर तो ZEE5  वर प्रदर्शित झाला आहे. पत्रकारांशी बोलताना त्याने सुशांत सिंग राजपूतने टीव्ही कलाकारांना न्याय देण्यासाठी मोठं योगदान दिलं तसंच पत्नी डेबिना बॅनर्जी सोबतची केमिस्ट्री ही त्याने सांगितली.

  पद्मीनी कोल्हापुरेंमुळं घडलं या अभिनेत्रीचं करिअर; पाहा नाकारलेल्या किसचा अनोखा किस्सा

  TV stars ना चित्रपट मिळणं कठीण जातं ? ”जेव्हा मी टेलिव्हिजन साठी काम करत होतो तेव्हा दिग्दर्शक मला म्हणायचे, लोक तुम्हाला टीव्ही वर फ्री मध्ये पाहतात. मग चित्रपटासाठी तिकीट कोण खरेदी करेल? आता वेळ बदलली आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाहरूख खान. त्याचबरोबर सुशांत सिंग ने देखील यात मोठं योगदान दिलं आहे. सुशांत आणि मी एकाच वेळी टीव्हीवर स्टार्स होतो. सुशांत स्वत:ला मोठ्या पडद्यावर सिद्ध केलं आणि त्यानंतर निर्माते आणि दिग्दर्शक टीव्हीस्टार्सकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. त्यानंर मला ऑफर्स येऊ लागल्या,” गुरमित चौधरी म्हणाला. “मी एका वर्षात एकच चित्रपट करतो. वाईफ हा माझा सोलो चित्रपट असला तरीही मागील 2-3  चित्रपट हे दोन किंवा तीन हिरो असलेले होते. जर स्क्रिप्ट चांगली असेल तर सोलो आहे की आणखी कोणी हिरो आहे याचा विचार मी करत नाही. TV च्या प्रेक्षकांना आधीच माझं टॅलेंट माहीत आहे. मी डान्स, रोमॅन्स, action सगळं काही करू शकतो. फिल्म इंडस्ट्रीने माझं टॅलेंट अजून पाहीलं नाही.  TV स्टार्सची आधीच फॅनफोलोईंग असल्याने त्यांना चित्रपचटगृहात पहायला प्रेक्षक नक्कीच येतील”, गुरमीत सांगतो.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या