जयपूर, 4 नोव्हेंबर: सणकी प्रियकरानं गुगलवरून (Youth used Google search to kill her girlfriend) खुनाचे अनेक प्रकार शोधत प्रेयसीचा खून केल्याची घटना उघडकीला आली आहे. आपल्या प्रेयसीला मारण्यापूर्वी त्याने अनेक दिवस गुगलवर खून करण्याचे प्रकार शोधल्याचं (Googled before killing girl) पोलीस तपासात दिसून आलं आहे. कमीत कमी शिक्षा होणारा खुनाचा प्रकार कुठला, याचा शोध तो अनेक दिवसांपासून घेत होता. त्यानंतर त्याने प्रेयसीची हत्या केली.
प्रेमप्रकरण बिनसले
राजस्थानच्या पाली भागात राहणाऱ्या अमृतलाल माली याचं त्याच भागातील एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होतं. दोघांचेही गेल्या काही आठवड्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र अमृतलाल हा सणकी असल्यामुळे तो नेहमी प्रेयसीवर संशय घेत असे. आपल्या प्रेयसीचं इतर कुणासोबत अफेअऱ सुरू असल्याचा संशय त्याला होता. त्यातूनच त्याने तिचा खून करण्याचा डाव आखला.
लग्नावरून झाला वाद
तरुणाने आपल्यासोबत लग्न करावं, असा तरुणीचा आग्रह होता. मात्र इतक्यात लग्न करायला तरुण तयार नव्हता. मात्र आपण लग्नाला नकार देत असल्यामुळे तरुणीचे इतर तरुणासोबत संबंध प्रस्थापित होत असल्याचा संशय त्याला होता. त्यामुळे त्याने तरुणीचा खून करण्याचा निर्णय घेतला.
निर्जन स्थळी केला खून
तरुणाने निर्जन स्थळी तरुणीला बोलावून घेतले आणि तिच्याशी वाद घातला. या ठिकाणी येण्यास तरुणीला उशीर झाला. या कारणावरून भडकलेल्या तरुणाने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. तरुणाने अणुकुचीदार दगडाने तरुणीच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला.
हे वाचा- कांड उघड होताच लाचखोर पोलिसानं ठोकली धूम; ACB च्या अधिकाऱ्यांना 1 किमी पळवलं
पोलीस तपास समोर आलं सत्य
तरुणीच्या खुनानंतर मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरच अटक केली. त्याचा मोबाईल तपासला असता पोलिसांना धक्कादायक माहिती समजली. तरुणाने खून कसा करावा आणि त्याची किती शिक्षा मिळते, याची सविस्तर माहिती गुगलवरून मिळवली होती. त्यामुळे हा खून पूर्वनियोजीत असल्याचे पुरावे मिळाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Boyfriend, Crime, Girlfriend, Murder, Police