मराठी बातम्या /बातम्या /देश /कांड उघड होताच लाचखोर पोलिसानं ठोकली धूम; ACB च्या अधिकाऱ्यांना 1 किमी पळवलं

कांड उघड होताच लाचखोर पोलिसानं ठोकली धूम; ACB च्या अधिकाऱ्यांना 1 किमी पळवलं

लाचखोर पोलिसाचा पाठलाग करताना ACB चे अधिकारी... (Photo-NDTV)

लाचखोर पोलिसाचा पाठलाग करताना ACB चे अधिकारी... (Photo-NDTV)

लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचा कांड उघड झाल्यानंतर, संबंधित आरोपी पोलिसाने अंगावरील वर्दी काढून थेट रस्त्यावरून धूम ठोकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बंगळुरू, 05 नोव्हेंबर: लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचा कांड उघड झाल्यानंतर, संबंधित आरोपी पोलिसाने अंगावरील वर्दी काढून थेट रस्त्यावरून धूम ठोकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे संबंधित भामट्या पोलिसाला पकडण्यासाठी अँटी करप्शन ब्युरोचे दोन अधिकारी त्याच्यापाठीमागे धावत असल्याचा नजारा दिसला आहे. भरदिवसा रस्त्यावरून जवळपास 1 किमी पाठलाग केल्यानंतर, ACB च्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील नागरिकांच्या पोलीस उपनिरीक्षकाला पकडलं आहे. बुधवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे.

संबंधित आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव सोमशेखर असून तो कर्नाटक राज्यातील तुमकुर शहरापासून 30 किमी अंतरावरील गुब्बीन येथील रहिवासी आहेत. ते चंद्रशेखर पुरा पोलीस ठाण्यात उप निरीक्षक म्हणून तैनात होते. अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सोमशेखर याच्यासोबत कॉन्स्टेबल नयाज अहमद यालाही अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा-17वर्षीय मुलीवर 17 जणांकडून गँगरेप; अनेक दिवस घरात डांबून सुरू होता भयावह प्रकार

नेमकं प्रकरण काय आहे?

काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर पुरा पोलीस ठाण्यात कौटुंबीक वादातून तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चंद्रन्ना नावाच्या एका व्यक्तीचं वाहन जप्त केलं होतं. संबंधित वाहन सोडवण्यासाठी आरोपी सोमशेखर याने कॉन्स्टेबल नयाज अहमद यांना 28 हजार रुपये घेण्याचा आदेश दिला होता. पण चंद्रन्ना यांनी याची माहिती अँटी करप्शन ब्युरोला दिली. यानंतर अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सापळा रचून आरोपी कॉन्स्टेबलला रंगेहाथ अटक केली.

हेही वाचा-गुप्तांगावर लाथ मारत शेजाऱ्याचं अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य; पुण्यातील घटना

कॉन्स्टेबलला अटक केल्यानंतर, त्याने पोलीस उप निरीक्षक सोमशेखर यांच्या आदेशावरून लाच मागितल्याची माहिती ACB च्या अधिकाऱ्यांना दिली. यानंतर ACB चे अधिकारी आरोपी सोमशेखर याला पकडण्यासाठी पोलीस ठाण्यात येताच, आरोपीनं आपल्या अंगावरील पोलिसाची वर्दी काढून पोलीस ठाण्यातून धूम ठोकली. लाचखोर पोलिसाला पकडण्यासाठी ACB चे दोन अधिकारी भररस्त्यातून त्याचा पाठलाग करू लागले. तब्बल एक किमी पळवल्यानंतर अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Karnataka