मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! मुलाने केला वडिलांच्या प्रेयसीचा खून, रोजच्या भांडणांना वैतागून केले वार

धक्कादायक! मुलाने केला वडिलांच्या प्रेयसीचा खून, रोजच्या भांडणांना वैतागून केले वार

आपल्या कुटुंबात वाद निर्माण करणाऱ्या वडिलांच्या प्रेयसीचा मुलाने खून केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्या साथीदाराच्या मदतीने त्याने हा खून केला.

  • Published by:  desk news

चंद्रपूर, 9 डिसेंबर: वडिलांच्या अफेअरला (Love affair of father) वैतालेल्या मुलाने (Son) त्यांच्या प्रेयसीचा खून (Murder of girlfriend) केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये (Chandrapur) घडली आहे. आपल्या वडिलांचं दुसऱ्या महिलोसोबत असणारं प्रेमप्रकरण, त्यावरून आई आणि वडिलांची होणारी सततची भांडणं आणि त्यामुळे समाजात होणार बदनामी यांना वैतागलेल्या तरुणाने हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी वडिलांच्या प्रेयसीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या प्रेयसीचा खून केल्यावर सर्व प्रश्न संपतील, असं त्याला वाटलं आणि त्याने एका साथीदाराच्या मदतीने महिलेच्या खुनाचा कट आखला.

असा केला खून

चंद्रपूरच्या रामनगर परिसरात राहणाऱ्या 55 वर्षांच्या व्यक्तीचं 35 वर्षांच्या महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. त्याच्या 20 वर्षांच्या मुलाला हे प्रकरण अमान्य होतं. त्यासाठी या तरुणाने त्याच्या चुलतभावाच्या मदतीने महिलेच्या हत्येचा कट रचला. घटनेच्या दिवशी महिलेला गाठून दोघांनी धारदार चाकूने महिलेच्या गळ्यावर आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा खून झाला. त्यानंतर पळून गेलेल्या मुलाला आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे.

हे वाचा-पहिलं पत्नीला केलं बेशुद्ध; नंतर गळ्यात टाकला फाशीचा दोर, पुढे घडला थरारक प्रकार

तपासात उलगडली अनेक तथ्यं

पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केल्यानंतर हे प्रकऱण भयंकर गुंतागुंतीचं असल्याचं लक्षात आलं आहे. ज्या महिलेचा खून झाला तिला तीन मुलं असून ती मुलांसोबत वेगळी राहत होती. तिच्या पतीनं दुसरं लग्न केलं असून तो दुसरी पत्नी आणि मुलांसह वेगळा राहत होता. या महिलेचे प्रेमसंबंध खुनी तरुणाच्या वडिलांसोबत सुरू होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातही कलह निर्माण झाला होता. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. चंद्रपूरमध्ये झालेल्या या हत्येमुळं खळबळ उडाली असून परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

First published:

Tags: Crime, Girlfriend, Murder, Police, Son