Home /News /national /

पहिलं पत्नीला केलं बेशुद्ध; नंतर गळ्यात टाकला फाशीचा दोर, पुढे घडला थरारक प्रकार

पहिलं पत्नीला केलं बेशुद्ध; नंतर गळ्यात टाकला फाशीचा दोर, पुढे घडला थरारक प्रकार

पती-पत्नीच्या नात्याला तडा देणारे एक प्रकरण समोर आलं आहे. हे ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल.

    हरियाणा, 09 डिसेंबर: हरियाणातील (Haryana) पानिपतमध्ये (Panipat) पती-पत्नीच्या नात्याला तडा देणारे एक प्रकरण समोर आलं आहे. हे ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. न्यू हाऊसिंग बोर्ड कॉलनीत राहणाऱ्या एका तरुणीने पानिपतच्या विकास नगरमध्ये राहणाऱ्या नीरजसोबत लग्न केलं होतं. मुलीचं हे दुसरं लग्न होतं. हा विवाह आंतरजातीय (inter-caste) होता जो नीरजच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. यामुळे पती-पत्नी दोघंही वेगळे राहू लागले. काही काळ सर्वकाही ठीक होतं. पण त्यानंतर पीडितेच्या पतीनं कुटुंबासह तिचा छळ सुरू केला, असा आरोप करण्यात आला आहे. शब्दा शब्दाला तिला जातीवाचक शिवीगाळ केली जाऊ लागली. हे सतत चालू राहिलं आणि ती सहन करत राहिली. हेही वाचा-  14 महिन्यांनंतर माघारी जाणार शेतकरी, 'किसान मोर्चा' आंदोलन स्थगितीची घोषणा पीडितेच्या म्हणण्यानुसार, एके दिवशी तिच्या पतीने तिला पाण्यात अंमली पदार्थ पाजलं आणि जबरदस्तीने तिला सुसाईड नोट लिहायला लावली. पीडितेनं सांगितले की, यानंतर पती तिला फास लावून पळून गेला, जेव्हा तिच्या मुलीने हे पाहिले तेव्हा तिने तिच्या मामा आणि आजीला याची माहिती दिली. त्यानंतर त्याला फाशीच्या दोऱ्यातून खाली उतरवलं. त्यानंतर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले. जवळपास 15 दिवस हॉस्पिटलमध्ये ती जीवन आणि मृत्यूची लढाई लढत होती. आता तिचा जीव वाचला असला तरी सध्या ती अंथरुणाला खिळली आहे. हेही वाचा- कोर्टात झालेल्या स्फोटानंतर खळबळ, परिसर केला रिकामी; दोन जण जखमी याप्रकरणी चांदनीबाग पोलीस स्टेशनचे प्रभारी मनजीत सिंह यांनी सांगितलं की, पीडितेच्या तक्रारीवरून आयपीसीच्या कलम 307 आणि 328 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. पीडितेवर उपचार करत असलेले डॉ. गौरव श्रीवास्तव यांनी सांगितले की, तिला रुग्णालयात आणले तेव्हा तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र, आता पीडित मुलगी तिच्या माहेरी राहत आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Haryana

    पुढील बातम्या