मुंबई, 13 जून, विजय वंजारा : धक्कादायक माहिती समोर आली आहे. 18 राज्यातील 200 एटीएम मशीनमधून दोन दिवसांत तब्बत अडीच कोटी रुपये गायब झाले आहेत. यासाठी चोरांनी गुन्ह्याची नवी पद्धत वापरून एटीएममधून पैसे गायब केले आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रमाणे दिनांक 12 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2022 या दोन दिवसांच्या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक माहिती की चोरट्यांनी दिनांक 12 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2022 या अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत देशभरातल्या 200 एटीएम मशीनमधून तब्बल अडीच कोटींपेक्षा अधिक रक्कम उकळली आहे. यासाठी विविध बँकांच्या 872 डेबिट कार्डचा वापर करण्यात आला, या डेबीट कार्डच्या मदतीनं 2 हजार 743 वेळा आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत. या व्यवहारातून दोन कोटी 53 लाख 13 हजार रुपयांची रक्कम अनधिकृतपणे काढण्यात आल्याचं समोर आलं आहे. गुन्हा दाखल सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मेसर्स हिटाची पेमेंट्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिलेल्या तक्रारीनुसार गोरेगावमधील वनराई पोलिसांनी भा. द. वी, कलम 420 व 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायदाच्या विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे. मेसर्स हिटाची पेमेंट्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी एटीएम मशिन तयार करून देशभरात पुरवते. बास्केटबॉलची मॅच पहाणं जीवावर बेतलं; मुलीचा भयानक मृत्यू, लातूर हादरलं एटीएम मशीनमध्ये स्वतःच्याच डेबिट कार्डचा वापर करून पैसे काढण्याची प्रक्रिया सुरु केली जाते आणि ऐन पैसे बाहेर येण्याच्या वेळी मशीनचा वीज पुरवठा खंडित केला जातो, अशी ही चोरीची पद्धत असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.