लातूर, 13 जून, सचिन सोळुंके : लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉजच्या खिडकीमध्ये बसलेल्या मुलीचा तोल जाऊन पडल्यानं मृत्यू झाला आहे. ही मुलगी दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली, मात्र खाली पडताना ती विजेच्या तारेवर कोसळली या अपघातामध्ये मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अद्या देशपांडे असं या 11 वर्षीय मुलीचं नाव आहे. ती हौदराबादची रहिवाशी आहे. मावशीसोबत लातूरला आली अन्… अद्या आपल्या मावशीसोबत लातूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आली होती. दुपारी कार्यक्रम संपल्यानंतर त्या दोघी लॉजवर आल्या. लॉजवर आल्यानंतर अद्या खिडकीतून बाहेर पाहत होती. या लॉजच्या शेजारीच जिल्हा परिषदेचं ग्राऊंड आहे, त्या ग्राऊंडवर हॉलीबॉलची मॅच सुरू होती. ती मॅच पहाण्याची इच्छा तिला झाली. त्यामुळे ती खिडकीजवळ जाऊन बसली होती. खिडकी लॉक आहे निघणार नाही या विश्वासावर ती खिडकीला टेकून बसली होती. अचानक खिडकी उघडली गेली. त्यामुळे अद्याचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. याच खिडकीच्या खालून विजेची तार गेली गेली आहे. आधी ती त्या तारेवर पडली नंतर खाली कोसळली, या घटनेत तिचा मृत्यू झाला. Mumbai News : जुहू बीच दुर्घटना, बुडालेल्या 5 जणांपैकी दोघांचे मृतदेह सापडले, दोन अद्यापही बेपत्ता कुटुंब लातूरकडे रवाना घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अद्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेथून तिला लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केलं. घटनेची माहिती मिळताच अद्याचे कुटुंब हैदराबादकडून लातूरला निघाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.