मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पालघरमध्ये भरदिवसा तरुणीवर गोळीबार, टिमा हॉस्पिटलजवळ भयानक रक्तपात

पालघरमध्ये भरदिवसा तरुणीवर गोळीबार, टिमा हॉस्पिटलजवळ भयानक रक्तपात

बोईसरमधील टिमा हॉस्पिटलजवळ हा गोळीबार झाला. या गोळीबारात स्नेहा दिनेशकुमार मेहतो या तरुणीचा मृत्यू झालाय.

बोईसरमधील टिमा हॉस्पिटलजवळ हा गोळीबार झाला. या गोळीबारात स्नेहा दिनेशकुमार मेहतो या तरुणीचा मृत्यू झालाय.

बोईसरमधील टिमा हॉस्पिटलजवळ हा गोळीबार झाला. या गोळीबारात स्नेहा दिनेशकुमार मेहतो या तरुणीचा मृत्यू झालाय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Palghar, India
  • Published by:  Chetan Patil

राहुल पाटील, पालघर, 28 सप्टेंबर : पालघरमध्ये एक भयानक घटना घडली आहे. जिल्ह्यातील बोईसर परिसरात एका तरुणीवर तरुणाकडून भरदिवसा रहदारीच्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात संबंधित तरुणीचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराच्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. तरुणाने प्रेम प्रकरणातून गोळीबार केल्याचा संशय पोलिसांना आहे. विशेष म्हणजे गोळीबारानंतर तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो स्वत:हून रस्त्याने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकच्या समोर गेला. त्यामुळे तो ट्रकखाली चिरडला गेला. सुरुवातीला तरुण जखमी असल्याची, त्याचे दोन पाय तुटल्याची माहिती समोर आली होती. पण त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बोईसरमधील टिमा हॉस्पिटलजवळ हा गोळीबार झाला. या गोळीबारात स्नेहा दिनेशकुमार मेहतो या तरुणीचा मृत्यू झालाय. विशेष म्हणजे तरुणीवर गोळीबार करुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आरोपी ट्रकखाली चिरडला गेला. खरंतर त्याने स्वत:हून ट्रकखाली आपला जीव देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्याचे दोन्ही पाय तुटले होते. रुग्णालयात घेवून गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या तरुणाचं नाव कृष्णा यादव असं होतं. पोलिसांनी त्याच्याजवळ सापडलेली रिव्हॉल्वर जप्त केली आहे.

(वसईत मोठी दुर्घटना, कंपनीत बॉयलरचा स्फोट, संपूर्ण परिसर हादरला)

घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पण भर दिवसा झालेल्या गोळीबारामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.

या गोळीबाराच्या घटनेमुळे बोईसर परिसरच प्रचंड हादरला. तरुणाने तरुणीवर गोळीबार नेमका का केला? तसेच त्याने त्यानंतर स्वत:ला का संपवलं? त्यांचं एकमेकांशी काही नातं होतं का? असे अनेक प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तरुणीचा मृतदेह रुग्णालयात पाठवला. तसेच जखमी तरुणाचा मृतदेह देखील रुग्णालयात नेला. प्रेम प्रकरणातून तरुणाने संबंधित कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे.

First published:

Tags: Crime, Gun firing, Murder