मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुलीचा जोडीदार पसंत नसल्याने Honor Killing, कुटुंबीयांनी ओलांडली क्रौर्याची सीमा

मुलीचा जोडीदार पसंत नसल्याने Honor Killing, कुटुंबीयांनी ओलांडली क्रौर्याची सीमा

मुलीने निवडलेला (Honor killing family of girl beaten boy to death due to love affari) जोडीदार पसंत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

सोनीपत, 10 नोव्हेंबर: मुलीने निवडलेला (Honor killing family of girl beaten boy to death due to love affari) जोडीदार पसंत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी या तरुणाची सोशल मीडियावरून (Introduced on social media) ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी आणि मैत्री होत दोघांनी लग्न करण्याचा निर्णय़ घेतला होता. मात्र मुलीच्या घरच्यांना हा निर्णय़ मान्य नसल्याने (Girl’s family killed boy) त्यांनी संधी साधत मुलाचे प्राण घेतले.

अशी घडली घटना

हरियाणातील सोनिपतमध्ये राहणाऱ्या बिजेंद्रचं एका मुलीवर प्रेम होतं. सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीनंतर दोघांनी अनेकदा भेटून एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघंही एकाच जातीतले असल्यामुळे घरच्यांकडून लग्नाला विरोध होणार नाही, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र मुलीने घरी कल्पना देताच तिच्या घरच्यांनी याला जोरदार विरोध केला.

पळून जाऊन करणार होते लग्न

घरच्यांच्या विरोधानंतरही दोघांनी लग्न करण्याचा आपला निर्णय बदलला नव्हता. लवकरच पळून जाऊन लग्न करण्याची योजना त्यांनी आखली होती आणि प्रत्यक्ष पळून जाण्याचा दिवसदेखील ठरला होता. घरच्यांना याची कल्पना आल्यानंतर त्यांनी तरुणाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

तरुणाला बेदम मारहाण

तरुणीच्या घरच्यांनी तरुणाला एकांतात गाठून बेदम मारहाण केली. दांडक्यांनी त्याच्या डोक्यावर वार करत बेशुद्ध केलं आणि त्याला झोडपून काढलं. त्याच्या गुप्तांगावरही वार करण्यात आले. त्याचं आतडंही त्यांनी बाहेर काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तरुणाला जबर मारहाण केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

हे वाचा-  जोरदार गाजतेय वाघ आणि कुत्र्याची लढाई, जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

पोलीस तपास सुरू

सुरुवातीला तरुणाचा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात त्याचा खून करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधील तपशीलांनंतर अधिक माहिती समजू शकणार आहे. या प्रकऱणी मुलीचा भाऊ अमनसह कुटुंबीयांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Haryana, Murder