नवी दिल्ली, 05 जानेवारी: देशाची राजधानी दिल्लीतील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेनं आपल्या पतीची धारदार चाकूनं वार करून हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपी महिलेनं स्वतः ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तत्पूर्वी आरोपी महिलेनं आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहून घटनेची कबुली दिली. तिनं पोस्टमध्ये म्हटलं की, मी माझ्या नवऱ्याची हत्या केली आहे. आता मी माझा जीवही देणार आहे.
यानंतर दक्षिण दिल्लीच्या पोलिसांनी तत्परता दाखवत या जोडप्याला रुग्णालयात दाखल केलं, जिथे आरोपी महिलेच्या नवऱ्याला मृत घोषित करण्यात आलं असून गंभीर जखमी आरोपी महिलेवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपी महिलेची प्रकृती सध्या स्थीर आहे.
(हे वाचा-आईसोबत झोपलेल्या 3 वर्षांच्या चिमुरडीला उचलून नेलं, पालघरमधील धक्कादायक घटना)
या घटनेची माहिती देताना दक्षिण दिल्लीचे डीसीपी अतुल ठाकूर यांनी सांगितलं की, संबंधित महिलेनं आपल्या पतीच्या हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आम्ही दोघांनाही तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी चिराग शर्मा (महिलेचा पती) यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. तर रेणुकावर (आरोपी महिला) उपचार सुरू आहेत. रेणुकाची प्रकृती सध्या स्थिर असून ती जाब देण्याच्या स्थितीत नाही. तिच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
8 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न
मिळालेल्या माहितीनुसार, चिराग आणि रेणुका या जोडप्याचं 8 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. ते 2013 पासून दक्षिण दिल्लीतील छतरपूर भागात राहत होते. हे दोघेही पती पत्नी एका विमा कंपनीत नोकरी करत होते. चिराग हा मुळचा हरियाणाचा आहे, तर पत्नी रेणुका उज्जैन येथील रहिवासी आहे.
(हे वाचा-....म्हणून त्याने भररस्त्यावर प्रेयसीवर झाडली गोळी, मुंबईतील घटनेला नवे वळण)
5 पेक्षा अधिक वेळा केला चाकुने वार
दिल्ली पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, मृत चिरागच्या शरीरावर पाचहून अधिक वार झाले आहेत. त्यानंतर आरोपी महिलेनं स्वतः ची नस कापण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यानंतर तिनं लायझॉलही पिला शिवाय घरातील पंख्याला लटकून जीव देण्याचाही प्रयत्न केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.