Home /News /crime /

आईसोबत झोपलेल्या 3 वर्षांच्या चिमुरडीला उचलून नेलं, पालघरमधील धक्कादायक घटना

आईसोबत झोपलेल्या 3 वर्षांच्या चिमुरडीला उचलून नेलं, पालघरमधील धक्कादायक घटना

मुलीला घेऊन पळ काढलेल्या अज्ञात आरोपीच्या व मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न आई वडिलांनी केला असता काही अंतरावरील शेतात मुलगी...

पालघर, 05 जानेवारी : पालघर (Palghar) जिल्ह्यातील तलासरी तालुक्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. घरात आईसोबत झोपलेल्या एका 3 वर्षांच्या चिमुरडीला घरातून पळवून नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 38 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे. तलासरी पाटील पाडा येथे राहणाऱ्या तीन वर्षीय चिमुरडीला शुक्रवारी रात्री अज्ञात इसमाने राहत्या घरातून पळवून नेले. मुलगी घरात नसल्याचे पाहूनर आई-वडिलांनी शोधाशोध सुरू केला. शेजाऱ्यांकडे विचारपूस केली असता मुलगी आढळून आली नाही. त्यानंतर घरापासून काही अंतरावर पीडित मुलगी  शेतात रडत बसलेली आणि जखमी अवस्थेत आढळून आली. मुलीला पाहून आई वडिलांच्या काळजाचा थरकाप उडाला. त्यांनी तातडीने याबद्दल पोलिसांना माहिती दिली. मास्क लावला नाही म्हणून टॅक्सी चालकानं गाडी नेली पोलीस ठाण्यात आणि... सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. पीडित मुलगी जखमी असल्याने पोलिसांनी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलासरी शहरातील पाटीलपाडा येथील आदिवासी पीडित चिमुरडी आणि तिचे कुटुंबीय राहत आहे. शुक्रवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास घरात आई सोबत झोपलेली असताना पीडित मुलीला अज्ञात आरोपीने उचलून नेले. FD करून भरघोस व्याजदर मिळवायचा असेल तर तुमच्यासमोर आहे 'या' बँकांचा पर्याय मुलीला घेऊन पळ काढलेल्या अज्ञात आरोपीच्या व मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न आई  वडिलांनी केला असता काही अंतरावरील शेतात मुलगी मिळून आली. त्यात ती पीडित चिमुरडी गंभीर जखमी असल्याने  उपचारासाठी तातडीने डहाणू येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य घेत एका आरोपीला अटक केली असून त्याचे नाव राजन भुरकुड ( 38 वर्ष) असून त्याच्या वर कलम  376(2),363, पोस्कॉ2012अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  आरोपी भुरकुडला  न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या