मुंबई, 05 जानेवारी : मुंबईतील मालाड भागात (malad mumbai) भर रस्त्यावर एका तरुणाने तरुणीला गोळी घालून तिची हत्या केली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. हे दोघेही प्रियकर-प्रेयसी होती. धक्कादायक म्हणजे, मुलीचा दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा झाला होता. त्यातूनच हे कृत्य घडले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही कांदिवली येथील धनगरवाडी परीसरात राहणारे होते. ही घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास मालाड येथील इनफिनिटी माॅलजवळ घडली. तरुणीचे वय 22 वर्षे तर मुलाचे वय 20 वर्षे असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. दोघांचे मृतदेह शताब्दी हाॅस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. EPFO मध्ये क्रेडिट होत आहे व्याज, तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे आले का? तरुणाने मुलीची हत्या करुन स्वत: आत्महत्या का केली? याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. मात्र दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु, या तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरले होते. एवढंच नाही तर मुलीचा साखरपुडा देखील झाला होता. हत्ये आधी तरुणाने त्या मुलीला आपल्या गाडीवर बसवून कांदिवली भागातून मालाड भागात घेवून आला होता, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली. घटनास्थळावरुन पोलिसांनी देशी कट्टा पोलिसांनी जप्त केला असून दोघेही कांदिवली परिसरात राहणारे असल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळावरुन मुंबई पोलिसांनी अनेक वस्तूजन्य पुरावे ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत हे घटनास्थळी दाखल झाले होते. तसंच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख देखील घटनास्थळी आले होते. त्यांनी घडलेल्या प्रकरणाची माहिती पोलिसांकडून घेतली. जान्हवी कपूरने मुंबईत खरेदी केलं नवं घर; किंमत ऐकून हैराण व्हाल दरम्यान, या तरुणाने देशी कट्टा कुठून आणला? घटने आधी तो कोणाला भेटला? तरुणाविरोधात तरुणीच्या घरच्यांनी काही तक्रार केली होती का? तरुणाने तरुणीला किंवा तिच्या घरच्यांना धमकावले होते का? पोलिसांत जर याची तक्रार देण्यात आली असेल तर पोलिसांनी तरुणाविरोधात काय कारवाई केली होती? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.