• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन गेलेल्या महिलेसोबत घडलं विपरीत; गळा आवळून झाला खून Murder news

बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन गेलेल्या महिलेसोबत घडलं विपरीत; गळा आवळून झाला खून Murder news

डोंगराळ भागात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या एका आदिवासी महिलेचा (woman went to graze goats) अज्ञात इसमांनी गळा आवळून हत्या (Murder by strangulation) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:
भिवंडी, 20 मार्च: डोंगराळ भागात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या एका आदिवासी महिलेचा (woman went to graze goats) अज्ञात इसमांनी गळा आवळून हत्या (Murder by strangulation) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित आदीवासी महिला काल दुपारी 4 च्या सुमारास शेलार गावाजवळील डोंगराळ भागात आपल्या बकऱ्या चारण्यासाठी गेली होती. पण काळोख पसरल्यानंतरही ती परतली नाही. तिचा काही अज्ञात लोकांनी गळा आवळून खून केला आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. डोंगरपाडा जवळील काटई गावात राहणाऱ्या 32 वर्षीय आदिवासी महिलेचं नाव सुशीला जीवन दिघे असं आहे. त्या गुरुवारी दुपारी 4 च्या सुमारास आपल्या बकऱ्या चारण्यासाठी शेलार गावच्या हद्दीतील डोंगराळ भागात गेल्या होत्या. मात्र काही अज्ञात इसमांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा कडवा प्रतिकार केल्याने अज्ञात इसमांनी तिचा गळा आवळून खून केल्याचं सांगण्यात येत आहे. गुरुवारी उशीरा बकऱ्या डोंगरातून चरून माघारी आल्या. मात्र सुशीला घरी परतली नाही. सायकांळी उशारी मृत महिलेचा पती जीवन दिघे घरी आल्यानंतर मुलांनी आई घरी न आल्याचं सांगितलं. त्यानंतर मृत महिलेचा पती जीवन दिघे यांनी शेजाऱ्यांच्या मदतीनं सुशिलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र सुशिलाचा काही थांगपत्ता लागला नाही. अखेर सुशीला ज्याठिकाणी बकऱ्या चारण्यासाठी गेल्या होत्या, त्या डोंगराळ भागात शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुशीला यांचा मृतदेह एका झुडुपात टाकल्याचा आढळून आला. हे ही वाचा -अपघाताचा बनाव करून खून केला, मात्र फक्त 1 तासातच फुटलं आरोपीचं बिंग त्यानंतर या घटनेची माहिती तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली. रात्री उशीरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग, पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे, वैभव देशपांडे आदी पोलीस अधिकारी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. काही अज्ञात इसमांनी सुशीलाचा गळा आवळून खून केल्याचं शवविच्छेदनात निष्पन्न झालं आहे. यानंतर मृत सुशीलाच्या बहिणीची फिर्यादीनंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू असून अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
Published by:Akshay Shitole
First published: