ठाणे, 22 जून: गेल्या 4 वर्षांपासून बेपत्ता (missing) असलेल्या पत्नीचा कसाबसा शोध लावला. पण, आपली पत्नी बेपत्ता झाली नव्हती तर प्रियकरासोबत (boyfriend) पळून गेली होती, अशी माहिती कळताच पतीच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. गेल्या चार वर्षांपासून पत्नीही तिच्या प्रियकरासोबत राहत असल्याचे उघड झाल्यामुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कल्याणमध्ये घडली आहे. सीमा कोष्टी असं या महिलेचं नाव आहे. 30 मे 2017 ती मनमाडला रेल्वेनं आली होती. त्यानंतर ती घरी आलीच नव्हती. तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळींनी तिचा बराच शोध घेतला. पोलिसांत तक्रारही दाखल केली. पण, 4 वर्ष झाले तिचा काहीच पत्ता लागला नाही. पण, काही दिवसांपूर्वी सीमा अंबरनाथमध्ये (Ambarnath) राहत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिची भेट घेण्यासाठी धाव घेतली. पण, सत्य परिस्थिती पाहून त्यांना चांगलाच धक्का बसला. राम मंदिर जन्मभूमी ट्रस्ट नावाने लाखोंची फसवणूक; फेक वेबसाईट बनवून उकळले पैसे आजतक या हिंदी वृतवाहिनीने कल्याण (Kalyan) इथं एका खासगी कंपनीत सीमा काम करत होती. तिथे शाहबाज शेख याच्याशी तिची ओळख झाली. 30 मे 2017 रोजी सीमा आपल्या माहेरी मनमाडला रेल्वेनं येत होती, तेव्हा ती घरी आलीच नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोधाशोध घेतला आणि मनमाड पोलिसांत तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे कल्याणमध्ये राहणार शाहबाज शेख सुद्धा बेपत्ता झाला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शाहबाजच्या कुटुंबावर नजर ठेवली. अखेर चार वर्षानंतर पोलिसांना खबर मिळाली कि, शाहबाजच्या काकाचं निधन झालं असून अंत्यसंस्काराला तो आपल्या पत्नी सनासोबत कल्याणमध्ये येणार आहे. असं काय घडलं की गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा? नवरदेवाला लगावली कानशिलात माहिती मिळताच पोलीस शाहबाज शेखच्या घरी पोहोचले. तेव्हा त्याची पत्नी सनाची चौकशी केली. तेव्हा ती सना नसून सीमा असल्याचे समोर आले. तिने सांगितले कि, बेपत्ता झाल्यानंतर आपण शाहबाज शेखसोबत लग्न केलं आणि नावही बदलून टाकलं. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.