फ्रान्स 27 जून : एका महिलेला आपल्या बलात्कारी पतीची हत्या (Woman Killed Rapist Husband) केल्याच्या प्रकरणात कोर्टानं (Court) शिक्षेतून मुक्त केलं आहे. यानंतर टाळ्या वाजवून तिचं स्वागत केलं गेलं. वॅलेरी बेकोट नावाच्या एका महिलेनं 2016 मध्ये सावत्र वडिलांवरुन पती बनलेल्या (Stepdad-Turned-Husband) डेनियल पोलेट याची गोळ्या झाडून हत्या केली होती. ही घटना फ्रान्समधील आहे. संबंधित महिलेनं तिला सुनावण्यात आलेल्या शिक्षेपेक्षा अधिक काळ जेलमध्ये घालवला. यानंतर महिलांच्या न्याय व हक्कासाठी काम करणाऱ्या काही महिलांच्या समूहानं तिची सुटका करण्यासाठी प्रदर्शन केलं होतं.
2016 मध्ये आपला पती डेनियल पोलेट याची हत्या करणाऱ्या महिलेला तीन वर्षाच्या निलंबनासह चार वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, आता न्यायालयानं तिला या शिक्षेतून मुक्त केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचं उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. न्यायालयाच्या या निर्णयानंतर बेकोटचे काही मित्र आणि कुटुंबातील लोकांना अश्रू अनावर झाले.
कैद्यानं तुरुंगात बोलावली कॉल गर्ल अन्..; फोटो व्हायरल झाल्यानं धक्कादायक खुलासा
न्यायाधीश सेलीन थर्म म्हणाले, की न्यायालयानं बेकोटला शिक्षा सुनावली होती, आणि तिनं ती अनेक वर्ष सहन केली. पतीच्या अत्यचारांमुळे पीडित (Rape Victim) असलेल्या बेकोटला शिक्षा मिळू नये, अशी मागणी जोर धरत होती. बेकोट 12 वर्षाची असताना तिच्या आईचा प्रियकर पोलेटनं तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार (Rape) केला. सुरुवातीला पोलेटला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली होती, मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही तो तिच्यावर बलात्कार करत राहिला आणि वयाच्या 17 व्या वर्षी ती गरोदर राहिली.
तिच्या दारुड्या आईनं तिला घरातून बाहेर काढलं आणि पोलेटसोबत राहाण्यास भाग पाडलं. यानंतर लैंगिक संबंधांसाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. बेकोटनं 61 वर्षीय पोलेटला गोळी मारल्याचं आणि आपल्या दोन मुलांच्या मदतीनं त्याचा मृतदेह जंगलात लपवल्याचं मान्य केलं होतं.
महिला सहकाऱ्याला KISS करणं भोवलं; फोटो व्हायरल होताच आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा
मागील महिन्यातच आपले अनुभन लोकांना सांगण्यासाठी तिनं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. हे प्रकरण सध्या फ्रान्समध्ये चांगलंच चर्चेत असून अनेक महिलांनी लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला आहे. सरकारी वकील एरिक जॅलेट यांनी न्यायालयात म्हटलं, की बॅकोटनं या व्यक्तीचा जीव घ्यायला नको होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder news, Rape news