लंडन 27 जून : ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक (Matt Hancock) यांचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा (UK Health Minister Matt Hancock Resigns) दिला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हॅन्कॉक आपल्या एका महिला सहकाऱ्याला किस (Kissing Photos) करताना दिसले होते. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला होता. हॅन्कॉक यांच्यावर कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला गेला होता. हा वाद समोर येताच ब्रिटनचं बोरिस जॉन्सन सरकार बॅकफूटवर आलं होतं. मॅट यांचा राजीनामा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वीकारला आहे. यासोबतच त्यांनी म्हटलं, की केवळ कोरोना महामारीच्या काळातच नाही तर त्याआधीही तुम्ही जे काही करून दाखवलं, त्याचा अभिमान सोबत ठेवून तुम्ही पद सोडायला हवं.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, 42 वर्षीय हॅन्कॉक यांनी जॉन्सन यांना दिलेल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलं, की आपण महामारीविरोधात लढण्यासाठी एका देशाच्या रूपात मोठी मेहनत केली आहे. हॅन्कॉक यांचं जिना कोलाडांगेलो (Gina Coladangelo) यांच्याशी सिक्रेट अफेअर (Matt Hancock’s secret affair) आहे. ब्रिटनच्या द सन वृत्तपत्रानं हॅन्कॉक आणि जिना कोलाडांगेलो यांचे किस करतानाचे फोटो प्रकाशित केल्यानंतर मॅट यांनी राजीनामा दिला आहे. हॅन्कॉक मागील महिन्यात आपल्या ऑफिसमध्येच एका सहकाऱ्याला मिठी मारताना दिसले होते. सुरुवातीला त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता आणि म्हटलं होतं, की हे प्रकरण आता संपलं आहे. त्यांनी माफीदेखील मागितली होती.
महिलांच्या Top Secret विषयी माहीत आहे का? पतीपासून लपवतात ‘या’ गोष्टी
किस करतानाचे फोटो समोर आल्यानंतर हे प्रकरण आणखी वाढत गेलं. कंजर्वेटीव पार्टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे, की मंत्र्याचं वागणं योग्य नव्हतं. यासोबतच त्यांनी असंही म्हटलं, की हॅन्कॉक यांनी त्याचं नियमांना पायदळी तुडवलं, जे बनवण्यात त्यांनी मदत केली होती. हॅन्कॉक यांचा राजीनामा जॉन्सन आणि त्यांच्या सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. जॉन्सन सरकार गेल्या बऱ्याच काळापासून कोणत्या ना कोणत्या विवादामुळे चर्चेत आहे.
वृत्तपत्रामध्ये फोटो छापून आल्यानंतर मॅट यांनी आपला लसीकरण केंद्रावर जाण्याचा दौराही रद्द केला होता. असं म्हटलं जात आहे, की हे सीसीटीव्ही फुटेज सहा मे चं होतं. याची छायाचित्रे प्रकाशित झाल्यानं गोंधळाला सुरुवात झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.