मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कैद्यानं तुरुंगात बोलावली कॉल गर्ल अन्...; फोटो व्हायरल झाल्यानं धक्कादायक खुलासा

कैद्यानं तुरुंगात बोलावली कॉल गर्ल अन्...; फोटो व्हायरल झाल्यानं धक्कादायक खुलासा

एका कैद्यानं (Prisoner) थेट जेलमध्येच कॉल गर्ल (Call Girl in Prison) बोलावली. या प्रकरणाचा खुलासा मोबाईलमध्ये काढण्यात आलेल्या काही फोटोंमुळे झाला.

एका कैद्यानं (Prisoner) थेट जेलमध्येच कॉल गर्ल (Call Girl in Prison) बोलावली. या प्रकरणाचा खुलासा मोबाईलमध्ये काढण्यात आलेल्या काही फोटोंमुळे झाला.

एका कैद्यानं (Prisoner) थेट जेलमध्येच कॉल गर्ल (Call Girl in Prison) बोलावली. या प्रकरणाचा खुलासा मोबाईलमध्ये काढण्यात आलेल्या काही फोटोंमुळे झाला.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 27 जून : एका कैद्यानं (Prisoner) थेट जेलमध्येच कॉल गर्ल (Call Girl in Prison) बोलावली. या प्रकरणाचा खुलासा मोबाईलमध्ये काढण्यात आलेल्या काही फोटोंमुळे झाला. हे फोटो (Obscene Pictures) समोर आल्यानंतर जेलच्या सुरक्षेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि याठिकाणी एकच गोंधळ उडाला. हे प्रकरण ब्रिटनच्या सफोकमधील एचएम जेलच्या होलेस्ले बे येथील आहे. यात एका कैद्यानं जेलमध्येच कॉल गर्ल बोलावली. यानंतर तिचे घाणेरडे फोटो मोबाईलमध्ये (Obscene Pictures in Mobile) काढण्यात आले.

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. यानंतर एकच गोंधळ उडाला. कॉल गर्ल अशाप्रकारे तुरुंगात पोहोचल्यानं तुरुग प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभा राहिलं. यासोबतच जेलमधील कैद्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्यास मनाई असताना कैद्याकडे फोन आला कसा, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

महिला सहकाऱ्याला KISS करणं भोवलं; फोटो व्हायरल होताच आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा

‘द सन’ या वेबसाइटच्या वृत्तानुसार, कैदी मादक पदार्थांच्या गुन्ह्यासाठी तुरूंगात शिक्षा भोगत आहे. कामगार खासदार आणि कॉमन्स जस्टिस सिलेक्ट कमिटीचे सदस्य अ‍ॅन्डी स्लॉटर म्हणाले की, 'खुले कारागृह पुनर्वसनाची ठिकाणे आहेत, लोकांनी मजेत जीवन जगण्याची नाही'.

पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. तुरूंगात आलेल्या संशयित महिलेचा शोध सुरू आहे. कारागृहात कॉल गर्लचे आगमन हे जेलमधील सुरक्षेबाबत मोठा प्रश्न उपस्थित करणारा मुद्दा असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, एका महिलेने अशा प्रकारे तुरूंगात येऊन स्वतःचा जीव मोठ्या संकटात टाकला. पुरुषांच्या तुरूंगात ती एकटीच आली होती, याठिकाणी बरेच धोकादायक गुन्हेगार आहेत. अनेक गुन्हेगार हिंसक आणि बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत आहेत.

तुम्हाला माहिती आहे का? सतत हवासा वाटणारा स्मार्टफोन तुमचं लैंगिक सुख हिरावतोय

असे मानलं जात आहे, की जर तुरुंगातील कैद्यांना या महिलेबद्दल माहिती मिळाली असती तर तिच्यावर हल्ला होऊ शकत होता आणि तिचा जीव धोक्यात येऊ शकत होता. ही महिला कैद्याची गर्लफ्रेंड नसल्याचं म्हटलं जात आहे. तुरुंग प्रशासनाच्या प्रवक्त्यानं म्हटलं, की हे वर्तन अस्वीकार्य आहे आणि त्यासाठी अपराध्याला शिक्षा झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. कारागृहात सुरक्षेबाबत अतिरिक्त उपाययोजना केल्या आहेत.

First published:

Tags: Britain, Crime, Prisoners