जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पुणे : लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध; Video ची धमकी देऊन पत्नीला वेश्याव्यवसायात ढकललं

पुणे : लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध; Video ची धमकी देऊन पत्नीला वेश्याव्यवसायात ढकललं

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका पबमध्ये पीडित तरुणी आणि एकाची ओळख झाली होती. यानंतर याने तरुणीला लग्नाचे आमिष देत शारिरिक संबंध ठेवले.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 28 ऑगस्ट : पुण्यात एका तरुणीला नोकरीच्या नावावर वेश्याव्यवसाय करायला लावण्याची घटना नुकतीच समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीलाच व्हिडिओ व्हायरल करत अशी धमकी देत वेश्याव्यवसाय करायला लावल्याची संतापजनक घटना पुण्यातील वडगावशेरी परिसरात आली. याप्रकरणी एका 30 वर्षीय तरुणीने चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - एका पबमध्ये पीडित तरुणी आणि एकाची ओळख झाली होती. यानंतर याने तरुणीला लग्नाचे आमिष देत शारिरिक संबंध ठेवले. तसेच त्याचा व्हिडिओ तयार करत त्याचे चित्रीकरणही केले. यानंतर त्याचा वाईट हेतू समोर आला. त्याने या तरुणीला तो शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली आणि वेश्याव्यवसायाला लावले. तरुणी पोलिसात तक्रार करेल म्हणून त्याने तिच्यासोबत लग्नदेखील केले. मात्र, त्यानंतरसुद्धा त्याचा तिला वेश्याव्यवसाय करायला लावला. हा प्रकार 2016 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत वडगाव शेरी, गोवा, बेंगलोर, सिंगापूर येथे घडला. तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर तिचा पती आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी ही कोलकात्याची आहे. 2016मध्ये शहरातील एका पबमध्ये या दोघांचा परिचय झाला होता. यानंतर त्यांची ओळख वाढल्यावर त्याने तिला लग्नाचे आमिष देत शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडिओही बनवला. नंतर हा व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देत तिला वेश्याव्यवसाय करायला लावला. ग्राहक आणून किंमतही ठरवली आणि त्या ग्राहकासोबत बळजबरीने गोवा येथे 4 दिवसांसाठी पाठवले. ग्राहकाने या तरुणीसोबत चार दिवस शारीरिक संबंध ठेवले. यानंतरही पीडितेला याबाबत घरी सांगण्याची तसेच पोलीस छाप्यात अडकवण्याची धमकी देत वेगवेगळ्या ग्राहकांबरोबर बंगळुरू, गोवा येथे तिला पाठवण्यात आले. इतकेच नव्हे तर तिचा पासपोर्टही काढून ठेवला होता आणि तिला दोन वेळा सिंगापूर येथे पाठवत वेश्याव्यवसाय करायला लावला. दरम्यान, त्याच्या मित्राच्या मित्राच्या रूमवर फिर्यादीला ठेवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती झाली होती. तर तिचा गर्भपात करण्यात आला. हेही वाचा -  सहा मुलांची आई होती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, प्रियकराने लग्नासाठी टाळाटाळ केल्यावर रिक्षातच केला त्याचा घात फिर्यादी तरुणी तक्रार करेल म्हणून आरोपीने तिच्याशी आळंदी येथे लग्न केले. मात्र, लग्नानंतरही तो आपल्या तरुण पत्नीला ग्राहकांकडे पाठवत वेश्याव्यवसाय करायला लावत होता. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी पती व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात