मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एका गुन्ह्याची उकल करण्यासाठी बिहारमधून पुण्यात आलेली महिला पोलीस; हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या

एका गुन्ह्याची उकल करण्यासाठी बिहारमधून पुण्यात आलेली महिला पोलीस; हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या

महिला कॉन्स्टेबल एका प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांच्या पथकासह पुण्याला गेली होती. टीमसोबत त्या एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. दरम्यान, नंतर त्यांचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत पडलेला आढळून आला

    पुणे 12 ऑगस्ट : पुण्यातील एका हॉटेलमध्ये बिहारमधील एका महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोजपूर जिल्ह्यातील कोईलवार येथील रहिवासी असलेल्या बिहार पोलीस कॉन्स्टेबल कविता कुमारी यांचा मृतदेह गुरुवारी पुणे येथील हॉटेलच्या खोलीतून संशयास्पद स्थितीत ताब्यात घेण्यात आला. ती कोइलवार नगर वॉर्ड क्र. 3 मधील रहिवासी बिराज कुमार यांच्या कन्या होत्या. त्यांची पोस्टिंग मुझफ्फरपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरा पोलीस ठाण्यात होती. कविता यांची आई माया देवी या पूर्वी प्रभाग 5 च्या नगरसेविका होत्या. कोल्हापुरात 'क्लास वन' अधिकाऱ्याचं शरमेनं मान खाली घालवणारं कृत्य, रक्षाबंधनाच्या दिवशी बेड्या महिला कॉन्स्टेबल एका प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांच्या पथकासह पुण्याला गेली होती. टीमसोबत त्या एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. दरम्यान, नंतर त्यांचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत पडलेला आढळून आला. गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या जवळच्या व्यक्तींना माहिती देण्यात आली. मुलीच्या निधनाची बातमी ऐकताच आईची रडून वाईट अवस्था झाली तर वडीलही बेशुद्ध झाले. घाईघाईत वडील पाटण्याहून विमानाने पुण्याला निघाले. महिला हवालदाराचा पतीही तिथे पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. मृत्यूचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. कविता यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात बध्रा पोलीस ठाण्याच्या फरणा गावात राहणारा भूपेंद्र पासवान याच्याशी झाला होता. भूपेंद्र हे वनविभागात कार्यरत आहेत. कविता यांचा एकुलता एक भाऊ सुमन कुमार हा उत्तराखंडमधील एका खासगी कंपनीत कामाला आहे. याठिकाणी कुटुंबाचे सांत्वन करणाऱ्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. पत्नीने घरातच दफन केला पतीचा मृतदेह; दुर्गंधी पसरल्यानंतर दिलं विचित्र कारण महिला कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं कारण काय, हे तपासानंतरच कळेल. मात्र आरा येथील कविता या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. येथे शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह हॉटेलमधील खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने ही आत्महत्या असू शकते, असा अंदाज पोलीस लावत आहेत. मात्र, याठिकाणी कोणतीही सुसाईट नोट सापडलेली नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Pune, Suicide

    पुढील बातम्या