मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पत्नीने घरातच दफन केला पतीचा मृतदेह; दुर्गंधी पसरल्यानंतर दिलं विचित्र कारण

पत्नीने घरातच दफन केला पतीचा मृतदेह; दुर्गंधी पसरल्यानंतर दिलं विचित्र कारण

दीराच्या फोननंतर महिला अलर्ट झाली होती. शेवटी तिने असं काही कारण सांगितलं की...

दीराच्या फोननंतर महिला अलर्ट झाली होती. शेवटी तिने असं काही कारण सांगितलं की...

दीराच्या फोननंतर महिला अलर्ट झाली होती. शेवटी तिने असं काही कारण सांगितलं की...

    लखनऊ, 11 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पत्नीने आपल्या पतीचा मृतदेह घरात पुरल्याचा प्रकार उघडकीस आला. मोठ्या भावाने पतीबद्दल विचारल्यानंतर महिला कारणं सांगत होती. शेवटी महिलेचं सत्य उघड झालं. पत्नी शिल्पीने आपल्या पतीचा मृतदेह घरातच दफन केला. यानंतर त्याच्यावर बॉक्स आणि अन्य सामान ठेवलं. ही घटना शाहजहापूर जिल्ह्यातील एका गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविद (30) पत्नीसह खमरिया गावात राहत होता. गोविंदच्या लहान भावाने त्या दिवशी घरी फोन केला, तेव्हा शिल्पी म्हणाली की, गोविंद काही कामानिमित्ताने बाहेर गेला आहे. भावाने काही दिवसांनी पुन्हा फोन केला. तेव्हाही शिल्पीने असच काहीसं कारण सांगितलं. यानंतर गोविंदचा भाऊ घरी पोहोचला. यावेळी त्याला घरात दुर्गंधी येत होती. यावेळी गोविंदची पत्नी म्हणाली की, उंदीर मेला असेल. गुरविंदरला संशय आल्याने त्याने पोलिसांना फोन केला. घरात पोलीस पोहोचले. यानंतर दुर्गंधी येणाऱ्या ठिकाणी खोदण्यात आलं. तर तेथे गोविंदचा मृतदेह होता. यावर शिल्पीला विचारलं असता ती म्हणाली की, रात्री तिचं गोविंदसोबत भांडण झालं होतं. यानंतर त्याने गळफास लावून घेतला. यात त्याचा मृत्यू झाला. पत्नीला पाहिल्यावर प्रेयसीच्या बेडमध्ये लपला पती, नंतर घडला फिल्मी ड्रामा, वाचा सविस्तर... ती घाबरली होती. त्यामुळे तिने पतीचा मृतदेह घरातच दफन केल्याचं सांगितलं. मृतदेह ताब्यात घेऊन तपास केला जात आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder, Uttar pradesh news, Wife and husband

    पुढील बातम्या