• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • दिवसाढवळ्या पेट्रोल ओतून पतीला पेटवलं; मग दगडानं ठेचून हत्या, पोलिसांना सांगितलं धक्कादायक कारण

दिवसाढवळ्या पेट्रोल ओतून पतीला पेटवलं; मग दगडानं ठेचून हत्या, पोलिसांना सांगितलं धक्कादायक कारण

file photo

file photo

एका महिलेनं दिवसाढवळ्या आपल्या पतीला पेटवून दिलं. इतकंच नाही तर यानंतर दगडानं ठेचून त्याची हत्या केली (Woman Kills Husband).

 • Share this:
  बंगळुरू 15 सप्टेंबर : हत्येची एक हैराण कऱणारी घटना (Crime News) नुकतीच समोर आली आहे. यात एका महिलेनं दिवसाढवळ्या आपल्या पतीला पेटवून दिलं. इतकंच नाही तर यानंतर दगडानं ठेचून त्याची हत्या केली (Woman Kills Husband). या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कर्नाटकच्या (Karnataka) तुमकूर येथील आहे. बायकोनं केलेला अपमान जिव्हारी लागला; पुण्यातील तरुणानं उचललं टोकाचं पाऊल द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मृत व्यक्तीचं नाव नारायण असं असून त्याची पत्नी अन्नपूर्णा हिने त्याच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं. एवढ्यावरच पत्नी थांबली नाही तर नंतर तिनं एक मोठा दगड नारायणच्या डोक्यात घातला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पत्नीसोबत भांडण होताच पतीचं धक्कादायक कृत्य; मुलीला वॉशिंग मशीनमध्ये टाकलं अन्.. पत्नीनं आग लावल्यानंतर पतीनं मदत मागण्यासाठी तिथून पळण्याचा प्रयत्न केला मात्र तो पत्नीच्या जाळ्यातून बाहेर पडू शकला नाही. यानंतर पत्नीनं त्याला नाल्यात ढकललं आणि मग डोक्यात मोठा दगड घातला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे शेजाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair of Woman) होते. मागील अनेक वर्षांपासून याच कारणामुळे पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होत असे. 8 वर्षाआधी या जोडप्याचं लग्न झालं होतं. त्यांना तीन मुलीही आहेत. आरोपी महिलेनं आपल्या पतीची हत्या केल्यानंतर स्वतःच पोलिसांकडे सरेंडर केलं आणि आपल्या गुन्हा मान्य केला. महिलेनं म्हटलं, की ती आपल्या पतीचा त्रास आणखी सहन करू शकत नव्हती, म्हणून तिनं पतीची हत्या केली. पोलिसांनी आरोपी महिलेच्या शेजाऱ्यालाही अटक केली आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: