मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पत्नीसोबत भांडण होताच पतीचं धक्कादायक कृत्य; 2 वर्षीय मुलीला वॉशिंग मशीनमध्ये टाकलं अन्...

पत्नीसोबत भांडण होताच पतीचं धक्कादायक कृत्य; 2 वर्षीय मुलीला वॉशिंग मशीनमध्ये टाकलं अन्...

पोलिसांनी मायकलला अटक केली आहे. त्याच्यावर आपल्याच मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे

पोलिसांनी मायकलला अटक केली आहे. त्याच्यावर आपल्याच मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे

पोलिसांनी मायकलला अटक केली आहे. त्याच्यावर आपल्याच मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे

नवी दिल्ली 15 सप्टेंबर : रागात बऱ्याचदा माणसाला आपण काय करतोय याचंही भान राहत नाही. काही वेळाच्या रागात माणूस अनेकदा इतकी मोठी चूक करतो की आयुष्यभर त्याला याचा पश्चाताप होत राहतो. त्यामुळेच रागात कधीच कोणता निर्णय न घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. याच रागामुळे अमेरिकेतील (America) न्यू हॅम्पशायर (New Hampshire) येथील एका व्यक्तीनं आपल्या हातानं आपल्या 2 वर्षीय बाळाचा जीव घेण्याचा निर्णय घेतला. या व्यक्तीनं आपल्या मुलीला वॉशिंग मशीनमध्ये (Father Puts Daughter in Washing Machine) टाकलं आणि याचं स्विच ऑन केलं.

दहशतवादी जान मोहम्मदच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती आली समोर

न्यूयॉर्क पोस्टमध्ये (New York Post) आलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी मायकलला अटक केली आहे. त्याच्यावर आपल्याच मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मुलीच्या आईनंच या घटनेची माहिती दिली. मूळचा मॅनचेस्टर (Menchester) येथील मायकल याचं कोणत्यातरी कारणावरुन आपल्या पत्नीसोबत भांडण झालं. याचमुळे रागात असलेल्या या व्यक्तीनं आपल्या मुलीला उचलून वॉशिंग मशीनमध्ये टाकलं. सुदैवानं मुलीच्या आईनं वेळेवर मशीनचं स्विच बंद केलं. यानंतर मुलीला बाहेर काढण्यात आलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलगी जास्त जखमी झालेली नाही. मात्र, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लोखंडी स्टॅण्डचे तीन घाव अन् खेळ खल्लास; 'ये शैतान मुझे तकलीफ दे रहा है' म्हणत..

पोलिसांनी मायकलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मागील काही दिवसांमध्ये अमेरिकेत मुलांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वीत टेक्सास येथील चार वर्षाची मुलगी कोरोनामुळे मरण पावली. मुलीच्या आईनं आपल्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला कोरोनाची लस घेऊ दिली नव्हती. तिच्या कुटुंबातील अनेकांना कोरोना झाला मात्र त्यांनी डॉक्टरांचा सल्लाही घेतला नाही.याचदरम्यान चिमुकलीची प्रकृती बिघडली आणि कोरोनानं तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेनं आपली चूक मान्य करत सर्वांना लस घेण्याची विनंती केली.

First published:
top videos

    Tags: Crime news, Viral news