मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जमीन हडपण्यासाठी सुनेनं केला सासूचा खून, हतबल पतीच्या डोळ्यांदेखल केले वार

जमीन हडपण्यासाठी सुनेनं केला सासूचा खून, हतबल पतीच्या डोळ्यांदेखल केले वार

 जमीन हडपण्यासाठी सुनेनं (Woman killed mother in law for property) तिचे वडील, भाऊ आणि मुलांच्या मदतीनं सासूचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे.

जमीन हडपण्यासाठी सुनेनं (Woman killed mother in law for property) तिचे वडील, भाऊ आणि मुलांच्या मदतीनं सासूचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे.

जमीन हडपण्यासाठी सुनेनं (Woman killed mother in law for property) तिचे वडील, भाऊ आणि मुलांच्या मदतीनं सासूचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

चंदिगढ, 8 नोव्हेंबर: जमीन हडपण्यासाठी सुनेनं (Woman killed mother in law for property) तिचे वडील, भाऊ आणि मुलांच्या मदतीनं सासूचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. घर आणि जमीन बळकावण्याच्या लालसेतून महिेलेनं आपल्या सासूवर चाकूचे (Murder for flat and land) सपासप वार केले. सासूचा जीव जाईपर्यंत ती वार करत राहिली आणि तिच्या पतीला आपल्या डोळ्यांदेखल आईचा खून पाहण्याशिवाय (Helpless son only could watch his mother dying) कुठलाही पर्याय उरला नाही.

नियोजन करून केला खून

हरियाणातील भिवानी जिल्ह्यात राहणाऱ्या 73 वर्षीय संतरा यांचे पती सैन्यात होते. त्यांचा एकुलता एक मुलगा जितेंद्र, सून आणि नातवंडासोबत त्या राहत होत्या. त्यांच्या नावे एक घर आणि काही जमीन होती. ही जमीन आपल्या नावावर करण्यात यावी, यासाठी त्यांच्या सुनेचे अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र त्यात तिला यश येत नव्हतं. अखेर आपल्या सासूचा खून करून तिच्या नावावरची जमीन हडपण्याचा डाव तिने रचला.

नातेवाईकांना बोलावले

या कटात सुनेनं तिच्या मुलांना, भावांना आणि वडिलांनाही सामील करून घेतले. घटनेच्या अगोदर या सर्वांना तिनं बोलावून घेतलं. खुनासाठी एक धारदार चाकूही विकत घेतला आणि संधी साधत आपल्या सासूवर वार केले. एकामागून एक वार केल्यामुळे काही वेळातच वृद्ध सासूचा मृत्यू झाला.

पतीच्या डोळ्यादेखल हत्या

आपली पत्नी आपल्या आईचा खून करत असताना तो उघड्या डोळ्यांनी पाहत राहण्याशिवाय आपल्याकडे कुठलाच पर्याय नसल्याचं पतीनं पोलिसांना सांगितलं आहे. तीन मुलं आणि मेहुण्यांनी आपल्याला घट्ट पकडून ठेवलं होतं. आपण सर्व शक्तीनिशी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र आपण काहीच करू शकलो नाही, याची खंत त्यानं व्यक्त केली आहे.

हे वाचा- दिवाळीत लक्ष्मीला पूजलं, नंतर घरातच्या 'लक्ष्मी'चाच केला शेवट; पतीचं भयावह पाऊल

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी सून, मुले, तिचे वडील आणि भाऊ यांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आाला असून लवकरच यातील सत्य बाहेर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Crime, Murder, Police