नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : ग्रेटर नोएडामधील (Greater Noida) सुत्याना गावात रविवारी रात्री एका घरगुती भांडणाचं भयावह रूप समोर आलं आहे. पती-पत्नीने (Wife-Husband) एकमेकांना प्रत्येक परिस्थितीत साथ देण्याचं वचन दिलेलं असतं. मात्र प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. (crime news)
काही जण वेगळं होण्याचा पर्याय निवडतात तर काहीनी उचलेलं पाऊस सर्वांना हैराण करणारं असतं. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीची पत्नी सतत आजारी होती. त्यामुळे पती कायम तिच्यावर चिडत असे. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होता. यातच पतीने पत्नीची गळा दाबून हत्या (Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत महिलेच्या बहिणीने स्वत:च्या भावोजींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात पतीला अटक केली आहे.
हे ही वाचा-शवगृहात महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार; मेमरी कार्डमध्ये सापडले अश्लील Video
बिहारमध्ये राहणारा मुंशीलाल सुत्याना गावात पत्नी लक्ष्मीसह भाड्याच्या घरात राहत होता. मुंशीलाल याचं लग्न एक वर्षांपूर्वी बिहारमधील रहिवासी लक्ष्मीसोबत झालं होतं. आरोप आहे की, लक्ष्मी सतत आजारी होती. ज्यामुळे आरोपी पत्नीसोबत खूश नव्हता. यामुळे दोघांमध्ये सतत भांडत होत असे.
रविवारीही दोघांमध्ये भांडण झालं. भांडणादरम्यान रागाच्या भरात आरोपी मुंशीलालने पत्नीची गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर तो घटनास्थळाहून फरार झाला. याबाबत माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं. यानंतर मृत महिलेच्या बहिणीने मुंशीलाल विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi, Murder, Wife and husband