Home /News /crime /

दुसऱ्या प्रियकराच्या मदतीनं प्रेयसीनं पहिल्या प्रियकरासोबत केलं धक्कादायक कृत्य

दुसऱ्या प्रियकराच्या मदतीनं प्रेयसीनं पहिल्या प्रियकरासोबत केलं धक्कादायक कृत्य

भाऊसाहेब माळी यांना अमरनाथ याच्या कारमधून 28 मे रोजी लातूरकडे नेले. यावेळी 8 वाजून 49 मिनिटांनी भाऊसाहेब माळी यांच्या फोनवर शेवटचा कॉल झाला.

    सोलापूर, 5 जून : दिवसेंदिवस राज्यात अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच प्रियकराच्या मदतीने खून (Murder), अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सातत्याने अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात (Maharashtra Crime News) होत आहे. यातच आणखी एक धक्कादायक बातमी महाराष्ट्राच्या सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेने परिसर हादरुन गेला आहे. काय आहे घटना ? अनैतिक संबंधातून येथे प्रेयसीने दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने एका वृद्धाचा खून (Murder in Immoral Relation) केला. भाऊसाहेब जगन्नाथ माळी, असे 60 वर्षीय मृताचे नाव आहे. भाऊसाहेब माळी हे 28 मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पैसे घेऊन येतो, असे सांगून घरुन निघून गेले होते. मात्र, ते परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. त्यांचा मुलगा प्रशांत माली याने 29 मे रोजी त्याचे वडील हरविल्याची तक्रारही पंढपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात (Pandharpur Rural Police Station) दिली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता मृत भाऊसाहेब माळी यांचे शेवटचे लोकेशन हे निलंगा तालुक्यात असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पंढरपूर पोलिसांनी निलगा पोलिसांना संपर्क केला असता पानचिंचोली येथे एक मृतदेह सापडल होता. तो भाऊसाहेब माळी यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. अनैतिक संबंधातून हत्या भाऊसाहेब जगन्नाथ माळी यांचे साधना चंद्रकांत धुमाळ (वय - 40, रा. दत्त मंदिराजवळ, सांगोला रोड, पंढरपूर) या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यामुळे ते या महिलेच्या घरी वेळी-अवेळी जात होते. त्यामुळे भाऊसाहेब आणि साधना या दोघांमध्ये वादही होत होते. याचदरम्यान, साधना धुमाळ या महिलेचे अमरनाथ अशोक किने या कारचालकाशी ओळख झाली. यानंतर त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. भाऊसोबत होणाऱ्या सततच्या वादातून साधना हिने आपला दुसरा प्रियकर अमरनाथ किने याच्या मदतीने त्यांची हत्या केली. तिने भाऊसाहेब माळी यांना अमरनाथ याच्या कारमधून 28 मे रोजी लातूरकडे नेले. यावेळी 8 वाजून 49 मिनिटांनी भाऊसाहेब माळी यांच्या फोनवर शेवटचा कॉल झाला. यानंतर त्यांचा फोन बंद झाला. पानचिंचोली येथे आल्यानंतर कारमध्येच साधना धुमाळ हिने आपला दुसरा प्रियकर अमरनाथ अशोक किने याच्या मदतीने भाऊसाहेब माळी याची हत्या केली. इतकेच नव्हे तर मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून दिला.  भयंकर! आईच्या प्रियकरामुळे 8 वेळा गर्भारपण; भ्रृणाच्या विक्रीचा सुरू केला बिझनेस, लज्जास्पद घटना मृतदेहाची ओळख पटत नसल्याने बेवारस मृत्यू म्हणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, पंढरपूर पोलिसांनी निलगा पोलिसांना संपर्क केला असता पानचिंचोली येथे एक मृतदेह सापडल होता. तो भाऊसाहेब माळी यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Pandharpur news

    पुढील बातम्या