तमिलनाडू, 4 जून : तमिळनाडूतील (Tamil Nadu Crime News) इरोडमध्ये अवैध भ्रृणाच्या व्यवसायाचा विचित्र प्रकार समोर आला आहे. एका 16 वर्षीय मुलीने याबाबत खुलासा केला तेव्हा लोक हादरलेच. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करीत मोठा पर्दाफाश केला आहे. मुलीची आई, तिचा प्रियकर यांच्यासह अन्य एका महिलेला अटक केली आहे. या प्रकरणात दोन खासगी रुग्णालयांविरोधात (Private Hospital) तपास केला जात आहे.
16 वर्षांच्या मुलीने या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हे ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत. मुलीने सांगितलं की, वयाच्या 12 व्या वर्षांपासून आईचा प्रियकर तिच्यावर लैंगिक शोषण करीत आहे. तो तिच्यासोबत शरीर संबंध ठेवत होता. ती गर्भवती झाल्यानंतर स्थानिक रुग्णालयात जाऊन तिचे भ्रृण एका खासगी फर्टिलिटी क्लिनिकमध्ये (selling embryos) विकत होता. आरोपी आणि रुग्णालय मिळून हा गुन्हा करीत होते.
पीडितेने सांगितलं की, वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या अत्याचारामुळे मुलगी आपल्या घरातून पळून गेली आणि एका नातेवाईकांच्या घरी पोहोचली. येथे तिने पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. मुलीने सांगितलं की, तिची आईदेखील या घृणास्पद कृत्यात सामील होती. एक वा दोन वेळेस नव्हे तर या अल्पवयीन मुलीचा भ्रृण 8 वेळा विकण्यात आला. प्रत्येक भ्रृणामागे तिच्या आईला 20 हजार रुपये मिळत होते.
पुढे महिलेने सांगितलं की, यात आणखी एका महिलेचा समावेश आहे. ती या सर्वात रुग्णालय आणि आईमध्ये एजेंटचं काम करीत होती. प्रत्येक भ्रृणामागे तिला 5 हजार रुपये कमिशन मिळत होते. पोलिसांनी या प्रकरणात प्रियकर, आई आणि अन्य महिलेला अटक केली आहे. या प्रकरणा दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Tamilnadu