पाटणा 03 एप्रिल : एका महिलेनं आपल्याच प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या सुपौलमध्ये झालेल्या हत्येच्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. इथे एका व्यक्तीने पत्नीच्या फोनवरून तिच्या प्रियकराला घरी बोलावलं. पती-पत्नीने मिळून त्याची हत्या केली. यानंतर मृतदेह नदीच्या काठावर फेकून दिला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरातील लोक हैराण झाले आहेत. विवाहित महिलेसोबतचं अफेअर 2 मुलांच्या बापाला भोवलं; अतिशय भयानक झाला प्रेमाचा शेवट सुपौलचे एसडीपीओ कुमार इंद्रप्रकाश यांनी सांगितलं की, शनिवारी सकाळी भापतियाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोशी नदीच्या काठावरील गोपालपूर गावात एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला. जगदीशपूर गावातील रहिवासी प्रदीप सुतिहार असं त्याचं नाव आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असता, त्या तरुणाचं चुलत भाऊ मनोज सुतिहार याच्या पत्नीशी शेवटचं बोलणं झाल्याचं निष्पन्न झालं. त्यावरून महिलेला आणि तिच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. इथे महिलेच्या पतीने सांगितलं की, प्रदीपचे त्याच्या पत्नीसोबत संबंध होते. एकासोबत अफेअर, कालांतराने दुसऱ्याकडे झुकला कल, शेवटी घडलं भयानक याच कारणामुळे कट रचून त्याने 30 मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पत्नीच्या सिमकार्डवरुन या तरुणाला फोन केला आणि घरी बोलावलं. यानंतर पती-पत्नीने लोखंडी हातोड्याने त्याची हत्या करून मृतदेह कोसी नदीच्या काठावर फेकून दिला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोघांनाही तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.