पाटणा 02 एप्रिल: गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता बिहारच्या समस्तीपूरमधूनही एक घटना समोर आली आहे. यात प्रेमप्रकरणातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. हे प्रकरण विभूतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडा गावातील आहे. खुनाच्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येक बाजूने या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा आलोक कुमार नावाच्या व्यक्तीची काही व्यक्तींनी गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह राम जानकी ठाकूरवाडी परिसराजवळ फेकून देण्यात आला. रविवारी सकाळी काही लोक गावातील एका मंदिरात पूजा करण्यासाठी जात असताना वाटेत त्यांना आलोकचा मृतदेह दिसला. याची माहिती ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
मामीसोबत अफेअर, मामाला समजताच ब्रेकअप; अन् मग नाराज भाच्याचं धक्कादायक कांड
तपास सुरू केला असता मृतक आलोक कुमार सिंग हा दोन मुलांचा बाप असून त्याचे एका विवाहित महिलेसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते, असं समजलं. वर्षभरापूर्वी याबाबत पंचायतही झाली होती. तरीही दोघांचं अफेअर सुरूच होतं. त्यामुळेच आलोकची हत्या झाली. मृताच्या नातेवाईकांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे. मात्र सध्या पोलीस प्रत्येक बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
याआधीही समस्तीपूरमधून अशीच एक बातमी समोर आली होती. यात चुलत बहिणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या मुलाने काकूची हत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 27 मार्च रोजी मोहिउद्दीननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात रात्री उशिरा एका महिलेची हत्या करण्यात आली होती. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुरावे गोळा केले आणि संशयाच्या आधारे महिलेच्या पुतण्याला अटक केली.
चौकशीत आरोपीने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितलं की, त्याचे त्याच्या चुलतीच्या मुलीसोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही मोबाईलवर बोलत होते आणि गप्पा मारत होते. दोघांनी एका मंदिरात लग्न केलं आणि गुपचूप पती-पत्नीप्रमाणे घरात राहत होते. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्याच्या काकूला याबाबत सुगावा लागला. यानंतर तिने मुलीला बहिणीच्या घरी पाठवलं. याच रागातून त्याने ही हत्या केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder news