Home /News /crime /

आधी पतीचे कान कापले, मग गळ्यावरून फिरवला सुरा अन्...; महिलेचं धक्कादायक कृत्य

आधी पतीचे कान कापले, मग गळ्यावरून फिरवला सुरा अन्...; महिलेचं धक्कादायक कृत्य

ही घटना 5 सप्टेंबर रोजी घडली आहे. घटनेत 65 वर्षीय महिला मार्गरेट वनजीरु हिनं आपला 99 वर्षीय पती नदूंग मुगाच्या याची हत्या केली.

    नवी दिल्ली 07 सप्टेंबर : पती -पत्नीच्या नातेसंबंधाच्या (Husband Wife Relation) अनेक बातम्या तुम्ही रोज पाहत किंवा ऐकत असाल. दोघांच्या या नात्यामध्ये प्रेम आणि कलह समान प्रमाणात असतात. याच कारणामुळे त्यांचं नातं अधिक खुलत असतं. पण जर या नात्यातील कटुता मर्यादेपलीकडे गेली तर त्याचा परिणाम भयानक होतो. नुकतंच केन्या येथे राहणाऱ्या एका महिलेला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी (Woman Killed Husband Over Small Dispute) पोलिसांनी अटक केली. नाश्त्यावरून झालेल्या भांडणानंतर महिलेने पतीची हत्या केली. अंधश्रद्धेच्या नावाखाली अश्लीलता; पावसासाठी मुलींना निर्वस्त्र करून गावभर फिरवलं ही घटना केन्याच्या (Kenya) कागमो इनि (Kagumo-ini) गावात घडली आहे. यात 65 वर्षीय महिलेनं आपल्या 99 वर्षाच्या पतीची गळा चिरून हत्या केली. फॉरेन मीडियाच्या वृत्तानुसार, दोघांचंही नाश्त्यावरून भांडण झालं होतं. हा वाद इतका वाढला की महिलेनं किचनमधून धारदार चाकी आणला आणि आपल्या पतीचा गळा चिरला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी महिलेला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 5 सप्टेंबर रोजी घडली आहे. घटनेत 65 वर्षीय महिला मार्गरेट वनजीरु हिनं आपल्या 99 वर्षीय पती नदूंग मुगाच्या याची हत्या केली. 5 सप्टेंबरला सकाळी साडेसातच्या सुमारास या दोघांमध्ये नाश्त्यावरुन वाद झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदूगाला त्यांच्या सूनेनं नाश्ता दिला होता. यानंतर नाश्त्यावरुन पती पत्नीमध्ये वाद झाला. वाद इतका वाढला की वनजीरु किचनमधून चाकू घेऊन आली. तिनं चाकून आधी आपल्या पतीचे कान कापले आणि यानंतर गळाही कापला. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचं घर शोधलं अन्..; तरुणानं GFला दिला भयंकर मृत्यू याबाबत माहिती देताना वनजीरुच्या सूनेनं सांगितलं, की तिच्या सासूला अचानक काहीतरी झालं. सासरे अत्यंत शांततेत नाश्ता करत होते, मात्र अचानक सासू तिथे येऊन भांडण करू लागली. जेव्हा सासऱ्यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिनं त्यांचा गळा कापला. वनजीरूच्या सूनेनं सांगितलं, की माझ्या सासूची अशी इच्छा होती की सासऱ्यांना कोणीही जेवण किंवा कपडे देऊ नयेत. ती सतत आपल्या पतीसोबत भांडत असे आणि अखेर तिनं आपल्या पतीची हत्या केली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या