भोपाळ 07 सप्टेंबर : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) दमोह जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बराच कमी पाऊस (Rain) झाला आहे. यामुळे शेतातील पिकंही डोळ्यादेखत जळताना दिसत आहेत. यामुळे, जिल्ह्यात चांगला पाऊस व्हावा यासाठी गावकऱ्यांनी परंपरेनुसार चालत आलेल्या काही प्रथांच्या माध्यमातून निरनिराळे कार्यक्रम सुरू केले आहेत. ग्रामीण भागातील लोकांचा असा समज आहे, की लहान मुलींना निर्वस्त्र करून गावातून फिरवल्यास पाऊस येतो. याच अंधश्रद्धेतून मुलींची पूर्ण कपडे काढून महिलांनी त्यांना गावातून फिरवलं (Minor Girls Made to Walk Naked in MP) आणि गाणी गायली. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचं घर शोधलं अन्..; तरुणानं GFला दिला भयंकर मृत्यू ही घटना दमोह जिल्ह्यातील जबेरा तहसीलच्या अंतर्गत येणाऱ्या बनिया गावातील आहे. इथे शेतीतील पिकं सुकताना पाहिल्यावर गावातील महिला एकत्र आल्या. यानंतर त्यांनी बेडकाला दोरीनं बांधत उलटं टांगलं आणि मग जवळपास सहा लहान मुलींचे कपडे काढले. यानंतर या मुलींना निर्वस्त्रच गावभर फिरवलं. तरुणाने महिलेचं कापलं नाक, FB वर CM कडे न्यायाची मागणी करीत पीडितेची आत्महत्या जेव्हा या संपूर्ण अंधश्रद्धेबद्दल या महिलांना विचारण्यात आलं, की त्यांनी असं का केलं तेव्हा त्यांनी सांगितलं, की असं केल्यावर चांगला पाऊस पडतो. आधुनिक युगातही अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आजही अनेक ठिकाणी पाळल्या जातात. यावर विश्वास ठेवून अत्यंत चुकीच्या गोष्टी केल्या जातात. मात्र, या गोष्टी लोकांच्या मनातून काढून टाकणंही कठीण आहे. या प्रकरणी दमोहचे पोलीस अधीक्षक डीआर तेनिवार म्हणाले, की संबंधित प्रकरणाचा तपास केला जात आहे. रिपोर्ट येताच कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.