विरार, 07 सप्टेंबर: नालासोपाऱ्यात एका तरुणानं आपल्या प्रेयसीची गळा आवळून हत्या (girlfriend's murder by strangulation) केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीनं प्रेमसंबंध (Love Affair) तोडून दुसऱ्या एका मुलासोबत सूत जुळवल्याच्या कारणातून आरोपीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक (Accused lover arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास तुळींज पोलीस करत आहे.
ज्योती गौतम असं हत्या झालेल्या 23 वर्षीय तरुणीचं नाव आहे. तर अविनाश कुमार असं अटक केलेल्या आरोपी प्रियकराचं नाव आहे. नालासोपारा पूर्वेतील आचोळे नगर येथील साडी कंपाऊंडमधील रहिवासी असणाऱ्या मृत ज्योती आणि आरोपी अविनाश याचं मागील काही काळापासून प्रेमसंबंध सुरू होते. आरोपी अविनाश हा एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. पण कोरोना प्रादुर्भावाच्या काळात त्याचं काम ठप्प झालं.
हेही वाचा-तरुणाने महिलेचं कापलं नाक, FB वर CM कडे न्यायाची मागणी करीत पीडितेची आत्महत्या
कोरोना काळात काम बंद पडल्यामुळे आरोपी अविनाश आपल्या मुळ गावी उत्तर प्रदेशात गेला. दरम्यान, मृत ज्योतीचे नालासोपाऱ्यातील दुसऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध जुळले होते. तसेच ती आपल्या दुसऱ्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. याची माहिती प्रियकर अविनाश याला समजताच तो उत्तरप्रदेशातून नालासोपाऱ्यात आला. पण ज्योतीनं आपलं घर बदललं होतं.
हेही वाचा-...म्हणून टोकाचं पाऊल उचललं, मला माफ करा; तलाठ्याकडून डॉक्टर पत्नीचा निर्घृण खून
पण अविनाशनं काही दिवस तिथेच राहून प्रेयसीच्या नवीन घराचा पत्ता शोधून काढला. यानंतर रविवारी आरोपी ज्योतीच्या घरी गेला आणि तिची गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच तपासाची चक्र फिरवत आरोपी प्रियकरालाही ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलीस आरोपीची चौकशी करत असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.